शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजमधील शासकीय जागा हडपण्याचा प्रयत्न?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 22:11 IST

देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनीतील गांधी वॉर्डमध्ये असलेल्या शासनाच्या खुल्या जागेवर काही बेघर गरीब कुटुंबांनी बांधलेल्या झोपड्या नगर परिषदेच्या वाहनांची मदत घेत पोलिसांनी रात्री ११ वाजता उठविल्या. यावेळी त्या कुटुंबांना शिवीगाळ आणि मारहाणही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ठळक मुद्देझोपडीधारकांना मारहाण : रात्री ११ वाजता केले बेघर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनीतील गांधी वॉर्डमध्ये असलेल्या शासनाच्या खुल्या जागेवर काही बेघर गरीब कुटुंबांनी बांधलेल्या झोपड्या नगर परिषदेच्या वाहनांची मदत घेत पोलिसांनी रात्री ११ वाजता उठविल्या. यावेळी त्या कुटुंबांना शिवीगाळ आणि मारहाणही झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दुसऱ्या कोणाला ती शासकीय जागा हडपण्यास मदत करण्यासाठी आम्हाला तेथून हटविण्यात आले असून आम्हाला हक्काचा निवारा देऊन न्याय द्यावा, अशी मागणी बेघर कुटुंबियांनी उपविभागीय अधिकाºयांमार्फत जिल्हाधिकाºयांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.सदर निवेदनात नमुद केल्यानुसार, देसाईगंजच्या गुलमोहर कॉलनी परिसरात महसूल व वनविभागाची काही जागा अनेक वर्षांपासून रिकामी पडून आहे. ती जागा हडपण्याच्या उद्देशाने कोणीतरी त्या जागेत बांधकाम साहित्य आणले होते. दरम्यान आतापर्यंत कुठेतरी आडोशाने राहणाºया गोरगरीब २५ कुटुंबांनी या शासकीय जागेत (सर्व्हे नं.४३२) काही दिवसांपूर्वी आश्रय घेतला. मात्र दि.२२ आॅक्टोबरच्या रात्री ११ च्या सुमारास अचानक पोलिसांचा ताफा आला आणि त्यांनी काहीही सूचना न करता त्यांच्या काठ्यांनी मारणे सुरू केले. आमचा गुन्हा काय, अशी विचारणा केली असता ते काहीही ऐकायला तयार नव्हते. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताफ्यासोबत नगर परिषदेचा कर्मचारी व ट्रॅक्टरसुद्धा झोपडीवाल्यांचे साहित्य नेण्यासाठी होता. त्यामुळे त्या जागेसंदर्भात नगर परिषदेचा संबंध काय? ती जागा नगर परिषदेच्या मालकीची नाही किंवा शासनाने कोणत्या कारणासाठी ती जागा कोणाला दिलेली नाही. मग असे असताना आम्हाला हटविण्यात नगर परिषदेने पुढाकार घेण्याची गरज काय? असा सवाल तक्रारकर्त्यांनी केला आहे.झोपडीधारकांवरील कारवाई नियमबाह्यवास्तविक कोणत्याही शासकीय जागेतील अतिक्रमण हटविताना संबंधितांना आधी नोटीस द्यावी लागते. त्यानंतरही ते स्वत:हून हटले नाही जबरीने अतिक्रमण काढता येते. पण सायंकाळी ६ वाजताच्या नंतर राहत्या घराचे अतिक्रमण हटविता येत नाही. असे असताना या प्रकरणात रात्री ११ वाजता कारवाई करून गोरगरीब कुटुंबांना बेघर कसे केले? असा प्रश्न तक्रारकर्त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी विमल बोरडे, पुष्पा रामटेके, राणी बन्सोड, शालू मेश्राम, विणा मेश्राम, तारा मडावी, विमल कनोजिया, कल्पना भोयर, सुशिला गजभिये, अन्वरी अंसारी, कनिजा शेख आदी अनेक महिला व पुरूषांनी केली आहे.