शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठाला २२ विभाग मिळवून देण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:21 IST

गोंडवाना विद्यापीठाबद्दल कोण काय बोलते याला फारसे महत्व न देता विद्यापीठ आपले काम करीत आहे. या विद्यापीठाला नागपूर विद्यापीठाएवढे २२ विभाग मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत, अशी माहिती कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

ठळक मुद्देकुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर : पुढील महिन्यापर्यंत १९२ एकर जागेची खरेदी प्रक्रिया पूर्ण होणार

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाबद्दल कोण काय बोलते याला फारसे महत्व न देता विद्यापीठ आपले काम करीत आहे. या विद्यापीठाला नागपूर विद्यापीठाएवढे २२ विभाग मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशिल आहोत, अशी माहिती कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.अवघ्या सात वर्षांच्या कार्यकाळात पाचवे कुलगुरू म्हणून कार्यभार सांभाळत असलेले डॉ.कल्याणकर यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या कुलगुरूंमध्ये ते सर्वाधिक काळ कुलगुरूपद सांभाळणारे ठरले आहेत. अजून दोन वर्षपर्यंत त्यांना आपल्या कामाची छाप पाडण्यासाठी मिळणार आहेत.आपल्या आतापर्यंतच्या कार्यकाळात विद्यापीठासाठी झालेली कामे आणि भविष्यातील योजनांबाबत डॉ.कल्याणकर यांनी महत्वपूर्ण माहिती दिली. २ आॅक्टोबर २०११ रोजी स्थापन झालेल्या या विद्यापीठात आतापर्यंत केवळ ५ पदव्युत्तर अभ्यासक्रम होते. यावर्षी आणखी ५ अभ्यासक्रमांची भर त्यात पडली आहे. त्यात मराठी, अप्लाईड एकॉनॉमिक्स, संगणक विज्ञान, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विषयांचा समावेश आहे. विद्यापीठात किमान २२ अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला असल्याचे यावेळी डॉ.कल्याणकर यांनी सांगितले.विद्यापीठाच्या कॉम्प्लेक्स परिसरातील कॅम्पसमध्ये १०० खाटांचे मुलांचे आणि १०० खाटांचे मुलींचे वसतिगृह तयार झाले आहे. याशिवाय अतिथीगृह आणि कुलगुरू निवासही तयार झाले. पुढील आठवड्यात सायन्स अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन होणार आहे. याशिवाय २६ कोटी रुपयातून परीक्षा भवनाची उभारणी करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.विद्यापीठाचा सध्याचा परिसर १० एकरचा आहे. मात्र ही जागा अपुरी आहे. त्यामुळे आरमोरी मार्गावर १९२ एकर जमीन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत सर्व जमिनीची खरेदी पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या कॅम्पसमुळे अडचणी येणार नाहीत का? या प्रश्नावर कुलगुरूंनी थोडी गैरसोय होईल तरी त्याला नाईलाज असल्याचे सांगितले. ज्या ठिकाणी आज विद्यापीठाचा कॅम्पस आहे त्या परिसरात जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे आरमोरी मार्गावर जावे लागल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.कौशल्य विकासावर भर देणारया जिल्ह्यात जे-जे व्यवसाय करणे शक्य आहेत त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रम शिकविण्याचे नियोजित आहे. त्यासाठी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्युटचे सहकार्य घेतले जाणार आहे. ज्या महाविद्यालयांची क्षमता आहे त्या महाविद्यालयांमध्ये हे कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम शिकविण्यास मान्यता दिली जाणार आहे. आदिवासी अध्यासन सुरू करण्याबाबतही भविष्यात निश्चितपणे विचार केला जाईल, असे डॉ.कल्याणकर यांनी सांगितले.

टॅग्स :universityविद्यापीठ