शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

वाघिणीच्या अधिवासात गेल्याने हल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:43 IST

५ एप्रिल ते १३ मे २०१७ या कालावधीत वडसा व आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन व्यक्तींवर वाघीनीने हल्ला करून ठार मारल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटना सदर मृतक व्यक्ती वाघीनीच्या अधिवासात ....

ठळक मुद्देरवी, कोंढाळातील घटना : राष्टÑीय व्याघ्र संवर्धन समितीचा प्रमाणभूत निष्कर्ष

प्रदीप बोडणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : ५ एप्रिल ते १३ मे २०१७ या कालावधीत वडसा व आरमोरी वनपरिक्षेत्रातील रवी, कोंढाळा येथील दोन व्यक्तींवर वाघीनीने हल्ला करून ठार मारल्याच्या घटना घडल्या. या दोन्ही घटना सदर मृतक व्यक्ती वाघीनीच्या अधिवासात गेल्याने घडल्या, असा प्रमाणभूत निष्कर्ष राष्टÑीय व्याघ्र संवर्धन समितीच्या सदस्यांनी काढला आहे.सदर घटनेतील कोंढाळा येथील मृत व्यक्ती हा मोहफूल गोळा करण्यासाठी सदर वाघीनीच्या अधिवासात गेला होता. तर दुसºया घटनेतील रवी गावातील एका शेतात उन्हाळी धान लावल्याने हा भाग एखाद्या गवती रमण्याप्रमाणे होता. शेतात मोटारपंप लावल्याने शेतात मुबलक पाणी होता. उन्हाळ्यात जंगलातील पाण्याचे स्त्रोत नष्ट होत असतात. तसेच हिरवळ वाढत नसल्याने अन्य प्राण्यांच्या पाण्याच्या हिरवळीच्या ठिकाणी वाघीनीचे वास्तव असते. त्यामुळे वाघासारख्या प्राण्याला मानवी चाहूल लागली तर आपल्याला धोका आहे, असे समजून भीतीपोटी वाघासारखे प्राणी मानवावर हल्ला करतात. मांजर वंशातील हे वन्यजीव हिंस्त्र असले तरी तेवढेच भितरे असतात. म्हणूनच या दोन्ही घटना आणि जनावरे ठार केल्याच्या घटना अशाच प्रकारातून घडल्या आहेत. त्यामुळे ती वाघीन नरभक्षक ठरविणे योग्य नसून हल्लेखोर होती, असा समितीचा निष्कर्ष अहवालात नमूद आहे.या मादी वाघीनीला १२ आॅगस्ट रोजी आरमोरी तालुक्याच्या रवी गावाजवळ बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. परिस्थिती तपासून सदर वाघीनीला गोरेवाडा रेस्क्यू सेंटर नागपूर येथे ठेवण्यात आले. तांत्रिक समितीने सर्व घटना व परिस्थिती तपासून सदर वाघीनीस सुरक्षित अधिवासात मुक्त करण्याच्या केलेल्या शिफारशिस राज्यस्तरीय समितीने सहमती दर्शविली आहे. जंगलव्याप्त क्षेत्र ही वन्यजीवाची निवासस्थाने असतात. जंगले मोठ्या प्रमाणात नष्ट झाली तर वन्यप्राणी मोकळ्या जागेत येतात. मानवाकडून त्यांचे निवारा व निवासस्थान हिसकविल्याने नाईलाजास्तव वन्यजीवांचे मानवावरील हल्ले वाढतात, अशीही तरतूद राष्टÑीय व्याघ्र संवर्धन समितीच्या अहवालात नमूद आहे. यापूर्वीही वन्यप्राण्यांचे निवासस्थान असलेल्या क्षेत्रात मानवाचे अधिवास वाढल्याने मानवावर हल्ले झाले आहेत.जनता व प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा- तांबटकरएखाद्या जंगलव्याप्त क्षेत्रात तडस, बिबट्या, वाघ या वन्यजीवांची चाहूल लागली तरी गैरसमजापोटी नागरिकांमध्ये विनाकरण भीतीचे वातावरण निर्माण होत असते. यावर कोणतीही शहानीशा न करून प्रसारमाध्यमांमार्फत त्याचे अवडंबर माजविले जाते. धोकादायक स्थिती असली तरी वनविभाग त्याची पूर्णत: दखल घेत असते. वर्तमानपत्रातून बातम्या प्रकाशित करताना पत्रकार व प्रसारमाध्यमांनी संयम बाळगावा, असे आवाहन आरमोरीचे वनपरिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी केले आहे.