शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एटीएममधील परिस्थिती ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 05:00 IST

प्रशासनाच्या नियमानुसार ई-पास न काढताच जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. याशिवाय रेड झोनमधून येताना ई-पास काढून आल्यानंतरही योग्य ती खबरदारी न घेता समाजात बिनधास्तपणे वावरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. परंतू प्रशासनाने कारवाईचा फास आवळला नसल्यामुळे असे लोक कोरोनाचा उद्रेक होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. बँकांच्या एटीएममधील बटनांना दिवसभरात शेकडो लोक स्पर्श करतात.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : राष्ट्रीयीकृत बँकांकडून नियमांना तिलांजली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बँकांच्या एटीएममध्ये जंतूसंसर्गाबाबत योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्यामुळे कोरोना पसरण्याची शक्यता असल्याबद्दलचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर अनेक नागरिक सतर्क झाले. मास्क लावून येणाऱ्यांचे प्रमाण काही अंशी वाढले, पण एटीएममधील परिस्थिती मात्र गुरूवारीही पूर्वीप्रमाणेच कायम होती. एटीएममध्ये उद्यापासून सॅनिटायझर ठेवणार, असे सांगणाऱ्या बँकांनी, किंवा जंतूसंसर्गाचे नियम पाळले नाही म्हणून प्रशासनाच्या वतीने कोणावरही कारवाई झाली नाही.प्रशासनाच्या नियमानुसार ई-पास न काढताच जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या बरीच आहे. याशिवाय रेड झोनमधून येताना ई-पास काढून आल्यानंतरही योग्य ती खबरदारी न घेता समाजात बिनधास्तपणे वावरणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. परंतू प्रशासनाने कारवाईचा फास आवळला नसल्यामुळे असे लोक कोरोनाचा उद्रेक होण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. बँकांच्या एटीएममधील बटनांना दिवसभरात शेकडो लोक स्पर्श करतात. त्यात एखादी कोरोनाबाधित व्यक्ती असल्यास अनेकांना नाहक कोरोनाबाधित व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला एटीएमचा वापर करण्याआधी हाताच्या बोटांना सॅनिटायझर लावणे गरजेचे आहे. त्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था संबंधित बँकांनी करणे अपेक्षित आहे. परंतू लोकमतने याबाबतचे गांभिर्य लक्षात आणून दिल्यानंतरही बँका आणि स्थानिक प्रशासकीय यंत्रणा त्याबाबत गंभीर दिसत नसल्यामुळे नागरिकांमधील बिनधास्तपणा यापुढे आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.आता सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने दररोज एटीएम मध्ये जाणाºयांची संख्या वाढणार आहे. सॅनिटायझरचा वापर न झाल्यास शेकडो नागरिक कोरोना संसर्गबाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :atmएटीएम