शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एटीएमधारकांची ससेहोलपट सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 00:23 IST

रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार जुने तंत्रज्ञान असलेले मॅगस्ट्रिप कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद करण्यात आले. या ग्राहकांना नवीन कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र अनेकांचे एटीएम कार्ड बँकेमध्ये आलेच नाही.

ठळक मुद्देएटीएम कार्डचा तुटवडा : जवळपास एक लाख एटीएम बंद

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रिझर्व बँक आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार जुने तंत्रज्ञान असलेले मॅगस्ट्रिप कार्ड ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद करण्यात आले. या ग्राहकांना नवीन कार्ड उपलब्ध करून देणे आवश्यक होते. मात्र अनेकांचे एटीएम कार्ड बँकेमध्ये आलेच नाही. त्यामुळे एटीएमधारकांची ससेहोलपट सुरूच आहे.बँकांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी जो मागेल त्याला एटीएम देणे सुरू केले. यापूर्वीच्या एटीएमला मॅगस्ट्रिप एटीएम कार्ड म्हटले जात होते. यामध्ये जुने तंत्रज्ञान असल्याने या एटीएम कार्डमुळे काहींना फसवणुकीच्या घटना घडल्या. यावर आळा घालण्यासाठी मायक्रो चिप असलेले ईएमव्ही (युरोपीयन मास्टर व्हिजा) कार्ड वापरण्याचा निर्णय आरबीआयने घेतला. जुने सर्व एटीएम कार्ड ३१ डिसेंबर २०१८ नंतर बंद होतील. अशा सूचना रिझर्व बँकेने बँकांना दिल्या होत्या. बँकांनीही संबंधित ग्राहकांना याबाबतची सूचना संदेशाच्या माध्यमातून दिली होती. मात्र जुने एटीएम कार्ड सुरू असेपर्यंत ग्राहकांनी नवीन कार्ड बदलून घेतले नाही. ३१ डिसेंबर रोजी जुने कार्ड बंद झाल्यानंतर एकच हाहाकार माजला. अनेकांना तर एटीएम कार्ड का काम करीत नाही, हे सुद्धा माहित नव्हते. बँकेत जाऊन विचारणा केल्यानंतर नेमके कारण कळले. जिल्हाभरातील जवळपास एक लाख एटीएम कार्ड बंद पडले. सदर एटीएम कार्ड विनामूल्य बदलून देणे ही त्या शाखेची व बँकेची जबाबदारी आहे. मात्र अनेकांचे नवीन एटीएम कार्ड अजूनही उपलब्ध झाले नाही. त्यामुळे ग्राहकांची अडचण वाढली आहे. राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जाऊन ग्राहक विचारणा करीत आहेत. मात्र मुख्य शाखेकडून कार्डच उपलब्ध झाले नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्हा बँकेचे आठ हजार कार्ड बदललेगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुद्धा आपल्या ग्राहकांना एटीएम सेवा देते. या बँकेचे एकूण १९ हजार ८५ एटीएमधारक ग्राहक आहेत. ३१ डिसेंबर २०१८ नंतर जुने कार्ड बंद होणार, याबाबत बँकेने ग्राहकांना आॅक्टोबर महिन्यातच मेसेज पाठवून याबाबतची सूचना दिली होती. काही जागरूक ग्राहकांनी वेळेतच एटीएम कार्ड बदलवून घेतले. आतापर्यंत ८ हजार ३३२ ग्राहकांनी नवीन एटीएम कार्ड बदलून घेतले आहेत.

टॅग्स :atmएटीएम