शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

जंगली हत्तींमुळे झालेल्या नुकसानीची मिळणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2022 05:00 IST

प्रचलित शासन निर्णयामध्ये वन्यहत्तींमुळे इमारती/ घरांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदींचा समावेश नव्हता. १७ जून राेजी काढलेल्या शासन निर्णयात मदत देण्याची तरतूद  करण्यात आली आहे.  हत्तींनी केलेल्या नुकसानीची तक्रार घटनेच्या तीन दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. वन्यहत्तींकडून ज्या मालमत्तेचे नुकसान झाले असेल अशी मालमत्ता, साहित्य जागेवरील वस्तुस्थितीचा पंचनामा होईपर्यंत घटनास्थळावरून हलविलेली नसावी.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महाराष्ट्र राज्यात वन्यहत्तींचा अधिवास आढळून येत नाही. तथापि, इतर राज्यांतून येणाऱ्या वन्यहत्तींमुळे होणारे शेतपिकाचे नुकसान, तसेच इतर मालमत्तेच्या होणाऱ्या नुकसानीपोटी अर्थसाहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तथापि, प्रचलित शासन निर्णयामध्ये वन्यहत्तींमुळे इमारती/ घरांचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई देण्याच्या तरतुदींचा समावेश नव्हता. १७ जून राेजी काढलेल्या शासन निर्णयात मदत देण्याची तरतूद  करण्यात  आली  आहे. हत्तींनी केलेल्या नुकसानीची तक्रार घटनेच्या तीन दिवसांच्या आत करणे आवश्यक आहे. वन्यहत्तींकडून ज्या मालमत्तेचे नुकसान झाले असेल अशी मालमत्ता, साहित्य जागेवरील वस्तुस्थितीचा पंचनामा होईपर्यंत घटनास्थळावरून हलविलेली नसावी. प्रत्येकप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावर जाऊन संबंधित  वनपरिक्षेत्र अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, तलाठी/ ग्रामसेवक या तीन सदस्यांच्या समितीमार्फत १४ दिवसांच्या आत पंचनामा करण्यात येईल व नुकसानीचे मूल्यमापन ठरवून अहवाल संबंधित सहायक वनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी / उपवनसंरक्षक यांना सादर करतील. संबंधित सहायक वनसंरक्षक / विभागीय वन अधिकारी / उपवनसंरक्षकांनी आदेश काढल्यानंतर ३ कामाच्या दिवसांच्या आत किंवा घटनेची तक्रार प्राप्त झाल्यापासून २६ दिवसांच्या आत आर्थिक साहाय्याची रक्कम बाधित व्यक्तीच्या खात्यात जमा केला जाईल किंवा रेखांकित धनादेश हस्तांतरित केला जाईल, असे निर्णयात म्हटले आहे.

यांना नाही मिळणार लाभ    वनजमिनीवर अतिक्रमणाद्वारे शेती करण्यात येत असेल, तर संबंधितास अर्थसाहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.     भारतीय वन अधिनियम, १९२७ किंवा वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये ज्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला गेला आहे, अशा व्यक्तीस सदरचा लाभ देय राहणार नाही.     ज्या कुटुंबाची चारपेक्षा अधिक गुरे मुक्त चराईसाठी जंगलात जातात त्यांना अर्थसाहाय्य अनुज्ञेय राहणार नाही.

...अशी मिळणार मदत 

शेती अवजारे व उपकरणे, बैलगाडीचे नुकसान झाल्यास नुकसानीची रक्कम मात्र जास्तीत जास्त पाच हजार रुपये, संरक्षक भिंत किंवा कुंपणाचे नुकसान झाल्यास जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. काैलारू घराचे नुकसान झाल्यास ५० हजार व स्लॅबच्या घराचे नुकसान झाल्यास एक लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग