मार्गदर्शन करताना आ. कृष्णा गजबे, उपस्थित चांगदेव फाये व अन्य.
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : संत सेवालाल महाराज यांनी सर्वसामान्यांची चिंता दूर करण्यासाठी सेवेचे व्रत धारण करून बंजारा समाजातील लोकांना एकत्रित राहण्याचा संदेश दिला. त्यामुळे समाजातील लोकांनी सेवालाल महाराजांचे विचार आत्मसात करून जीवन जगावे, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले. कुरखेडा येथे आयोजित श्री संत सेवालाल महाराज जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुरखेडा नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे हे होते. विशेष अतिथी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल तर प्रमुख अतिथी भाजयुमो जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये, प्राचार्य उमा चंदेल, विष्णू आडे, अर्जुन राठोड, जितेंद्र राठोड, मंगेश पांडे, एल. बी. चौधरी, एफ. पी. जाधव, श्रीहरी सयाम, अरविंद जाधव आदी उपस्थित हाेते. यावेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, चांगदेव फाये, प्राचार्य उमा चंदेल यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी राज्य परिवहन बसस्थानक कुरखेडा येथे कृष्णा गजबे यांनी आमदार निधीतून पाणी शुद्धीकरण व शीतकरण यंत्राचे लोकार्पण करण्यात आले.
सूत्रसंचालन प्रा. विनोद नागपूरकर, प्रास्ताविक नवनाथ पवार तर कनिष्ठ लिपिक गणेश चौहान यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश राठोड, नाईक गोरतांडा, बंजारा समाजातील संत सेवालाल महाराज जयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.