शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील विद्यार्थी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:00 IST

देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील धंनजय नाकाडे आश्रमशाळेत दहाव्या वर्गात शिकणारा प्रकाश अशोक मडावी (१५) हा विद्यार्थी ५ नोव्हेंबरपासुन बेपत्ता असल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ माजली आहे.

ठळक मुद्दे१४ दिवसांपासून शोध सुरू : कोकडी शाळेतील विद्यार्थी

आॅनलाईन लोकमतदेसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील धंनजय नाकाडे आश्रमशाळेत दहाव्या वर्गात शिकणारा प्रकाश अशोक मडावी (१५) हा विद्यार्थी ५ नोव्हेंबरपासुन बेपत्ता असल्याची माहिती पुढे आल्याने खळबळ माजली आहे.मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे यांनी ७ नोव्हेंबर रोजी प्रकाश मडावी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. या तक्रारीनुसार, ५ नोव्हेंबर रोजी भोजनाच्या वेळी हजेरी घेत असताना प्रकाश मडावी बेपत्ता असल्याचे समजले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, तसेच नातेवाईकांनाही विचारपूस केली. परंतु प्रकाश आढळला नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांनी पोलिसांत तक्रार नोंदविली.यासंदर्भात देसाईगंज पोलिसांनी मुख्याध्यापकांच्या तक्रारीची नोंद घेतली आहे. प्रकाश मडावी याच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचे निधन झाले. त्यामुळे लहानपणापासूनच तो मुरमाडी येथे आपल्या आजीकडे राहत असून वडिलांनी दुसरे लग्न केले आहे. आठव्या वगार्पासून प्रकाश कोकडी येथील धंनजय नाकाडे आश्रमशाळेत शिकत आहे.मागील वर्षीसुद्धा या आश्रमशाळेतून प्रकाश पळाला होता व गस्तीदरम्यान तो पोलिसांना मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा आश्रमशाळेत आणून सोडले होते. आताही तो दिवाळीच्या सुटीनंतर १ नोव्हेंबरला आश्रमशाळेत आला व ५ तारखेला शाळेतून पळाला, अशी माहिती मुख्याध्यापक देवेंद्र नाकाडे यांनी दिली.मुख्याध्यापकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकाश मडावी याच्या वर्गमित्राची चौकशी केली असता, प्रकाश हा कोकडीवरून देसाईगंजपर्यंत एका ट्रॅक्टरवर बसून गेल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाला विचारणा केली असता, प्रकाश हा ट्रॅक्टरने देसाईगंज येथील भगतसिंग वार्डापर्यंत आला. पुढे तो फवारा चौकाकडे गेला. त्यानंतर तो नेमका कुठे गेला, हे माहित नसल्याचे सांगितले. पोलीस तक्रार झाल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र अजूनपर्यंत तो मिळाला नाही. त्यामुळे प्रकाश मडावी याचा शोधणे मोठे आव्हान ठरले आहे. या प्रकरणाकडे ठाणेदार स्वत: लक्ष घालून तपास करीत आहेत.