शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांचे क्रीडा संमेलन सुरू

By admin | Updated: August 28, 2015 00:14 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा बिटस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. वाय. भिवगडे यांच्या हस्ते गुरूवारी पार पडले.

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा बिटस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी व्ही. वाय. भिवगडे यांच्या हस्ते गुरूवारी पार पडले. सदर खेळ गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सुरू असून यामध्ये ५६१ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख प्रभाकर कोठारे होते. प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक डब्ल्यू. के. भोयर, सुधीर शेंडे, मुख्याध्यापक सुभाष लांडे, मुख्याध्यापिका यशोधरा उसेंडी, डब्ल्यू. के. मडकाम, एम. के. गेडाम, डी. डी. गलगट, संदीप दोनाडकर, व्ही. जी. चाचरकर आदी उपस्थित होते. चार दिवसीय क्रीडा संमेलनात गडचिरोली, कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही येथील शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा येथील अनुदानीत आश्रमशाळेतील ५६१ खेळाडूंनी सहभाग घेतला. संमेलनात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅन्डबॉल या सांघिक खेळासोबतच वैयक्तिक खेळांचे आयोजन केले आहे.उद्घाटनप्रसंगी इंग्रजी माध्यमाच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी गोंडी नृत्य सादर केले. उद्घाटनपर कबड्डी सामन्यात पोटेगाव आश्रमशाळेने कारवाफा आश्रमशाळेवर मात केली. प्रास्ताविक सुभाष लांडे, संचालन प्रतीभा बनाईत, के. पी. मेश्राम तर आभार करिष्मा राखुंडे यांनी मानले. के. पी. मेश्राम यांनी खेळाडू व पंचांना शपथ दिली. यशस्वीतेसाठी संदीप राठोड, मोरेश्वर धवणे, संदीप फड, मीना श्रीरामे, बुलबुले वाळके, सतीश पवार, सुधीर झंझाळ, के. जी. गेडाम, ए. डब्ल्यू. बोरकर, वाल्मिक घोडाम, ज्ञानेश्वर बावनथडे, विनायक भेंडारकर, ए. एम. बारसागडे, जे. डी. धांडे, निर्मला हेडो, एम. पी. चंबुलवार, निर्मला हजारे, भास्कर राजगडे यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)