लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आशा स्वयंसेविकांना १० हजार तर गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन द्यावे, या मागणीसाठी जिल्हाभरातील शेकडो आशा व गटप्रवर्तकांनी २७ जून रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर आयटकच्या नेतृत्वात मोर्चा काढून निदर्शने दिली. मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांना पाठविण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, मंत्रालयातील बैठकीत ठरल्यानुसार आशांना १० हजार रुपये तर गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये प्रतीमाह मानधन लागू करावे, आशा व गटप्रवर्तकांना दिवाळी बोनस म्हणून पाच हजार रुपये रक्कम द्यावी, शैक्षणिक पात्रतेप्रमाणे जिल्हा परिषदेतील रिक्त पदांवर सामावून घ्यावे, यवतमाळ औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे आशांना १८ हजार तर गटप्रवर्तकांना २१ हजार रुपये मानधन द्यावे, केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे वेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, माजी केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांनी १७ आॅगस्ट २०१६ ला आशांना प्रती दिन ३५० व गटप्रवर्तकांना ४५० रुपये प्राव्हिडंट फन्ड, आरोग्य सुविधा लागू करण्याची घोषणा केली असून याचा पाठपुरावा राज्य शासनाने करावा, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनोद झोडगे, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, भाकप नेते डॉ.महेश कोपुलवार, जिल्हा सचिव रजनी गेडाम, कविता दरवडे, संगीता मेश्राम, विद्यादेवी येजुलवार, किरण गजभिये, विजया मोहुर्ले, माया अलाम, कल्पना हुमने, गीता रामटेके, अमोल दामले यांनी केले.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत चर्चाआंदोलनानंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांना सादर केले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर उपस्थित होते. आशा व गटप्रवर्तक यांच्या मागण्या व समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. स्थानिक मागण्या सोडविण्यासाठी लवकरच जिल्हा परिषदेत संघटनेची बैठक बोलविण्याचे आश्वासन डॉ.शंभरकर यांनी दिले. मानधन वाढीचा निर्णय न झाल्यास जुलै महिन्यात कामबंद आंदोलनाचा इशारा विनोद झोडगे यांनी दिला.
आशा व गट प्रवर्तकांची जिल्हा परिषदेवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:32 IST
आशा स्वयंसेविकांना १० हजार तर गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन द्यावे, या मागणीसाठी जिल्हाभरातील शेकडो आशा व गटप्रवर्तकांनी २७ जून रोजी जिल्हा परिषद कार्यालयावर आयटकच्या नेतृत्वात मोर्चा काढून निदर्शने दिली. मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांच्यामार्फत मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांना पाठविण्यात आले.
आशा व गट प्रवर्तकांची जिल्हा परिषदेवर धडक
ठळक मुद्देमानधनात वाढ करा : मुख्यमंत्र्यांच्या नावे दिले निवेदन