पोलिसांतर्फे नागरिकांचे जनजागरण : एटापल्लीत तीन दिवसीय मेळाव्याचा समारोपएटापल्ली : पोलीस विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, कृषी विभाग, आरोग्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते १६ डिसेंबर या कालावधीत एटापल्ली येथे आयोजित जनजागरण मेळाव्यात कला, क्रीडा, सांस्कृतिक गुणांची उधळण करण्यात आली. त्याबरोबरच मेळाव्यात विविध विभागाच्या योजनांची माहिती देण्यात आली.उद्घाटन नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार यांच्या हस्ते झाले. यावेळी पं. स. सभापती दीपक फुलसंगे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून नगर पंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, पं. स. उपसभापती संजय चरडुके, नगरसेवक दीपक सोनटक्के, प्रसाद राजकोंडावार व नागरिक उपस्थित होते.तीन दिवसीय मेळाव्यात कबड्डीचे ३० संघ, व्हॉलिबॉलचे ४२ संघ तसेच महिला गटात कबड्डीचे चार व व्हॉलिबॉलच्या चार संघांनी सहभाग नोंदविला. पुरूषांच्या खुला गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम परसलगोंदी, द्वितीय जीवनगट्टा तर तृतीय क्रमांक गुरूपल्ली संघाने पटकाविला. व्हॉलिबॉलमध्ये प्रथम एटापल्ली कानन, द्वितीय आलदंडी, तृतीय हालेवारा, महिला कबड्डी स्पर्धेत प्रथम कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, द्वितीय जि. प. शाळा एटापल्ली, व्हॉलिबॉलमध्ये प्रथम मुलींचे वसतिगृह, द्वितीय क्रमांक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाने पटकाविला.यावेळी निवडक दहा संघांना नेट व व्हॉलिबॉल वितरित करण्यात आले. मॅराथॉनमध्ये पुरूष गटात प्रथम मधुकर जोगा, द्वितीय रवी नरोटी, तृतीय उमेश गोटा, महिलांमध्ये प्रथम सुशीला तलांडे, द्वितीय रवीना गावडे, बालकांमध्ये प्रथम ममता डोनारकर, द्वितीय शीतल गोटामी तर तृतीय वैष्णवी आत्राम, सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम रोशन मुलकावार, द्वितीय अल्मस्त ग्रुप, तृतीय निहाल बाला, रांगोळीत प्रथम रोशन मुलकावार, द्वितीय सुरेखा अडगोपुलवार, तृतीय शीतल गोटामी, मेहंदी स्पर्धेत प्रथम अडगोपुलवार, द्वितीय शीतल शिंदे तर तृतीय दामोधर शरयू नामेवार याने पटकाविला. विजेत्यांना तहसीलदार संपत खलाटे, नगराध्यक्ष सरिता राजकोंडावार, सभापती फुलसंगे, चरडुके, सोनटक्के, एसडीपीओ नितीन जाधव, ठाणेदार सुहास आव्हाड, महेश पाटील, मदणे व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
कला, क्रीडा, सांस्कृतिक उधळण
By admin | Updated: December 19, 2015 01:32 IST