तालुकास्तरीय आयोजन : गडचिरोली येथे कार्यक्रमगडचिरोली : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने २४ ते २८ आॅगस्टदरम्यान आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा संमेलनात विद्यार्थ्यांनी क्रीडा व इतर कलागुणांची उधळण केली. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रजीत शिंदे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक वाय. आर. मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून वसंत विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधाकर लाकडे, तालुका क्रीडा सचिव के. ए. म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी कबड्डी, खो- खो, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक आदीसह विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन आर. एस. करकाडे यांनी केले तर आभार कारेकार यांनी मानले.
क्रीडा स्पर्धांतून कलाकौशल्यांची उधळण
By admin | Updated: August 26, 2015 01:18 IST