शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
4
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
5
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
6
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
7
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
8
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
9
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
10
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
11
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
12
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
13
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
14
नेटफ्लिक्सचा 'स्क्विड गेम 3' सुपरहिट की फ्लॉप? प्रेक्षकांच्या नाराजीमुळे शेअर बाजारात हाहाकार!
15
July Born Astro: कसा ओळखावा जुलैमधल्या लोकांचा स्वभाव? ब्रह्मदेवालाही कळणे कठीण; वाचा गुण-दोष!
16
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
17
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
18
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
19
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
20
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...

कर्मचारी महिलेच्या घरी धुडगूस घालणाऱ्या पत्रकारास अटक

By admin | Updated: May 14, 2016 01:14 IST

येथील पंचायत समिती कार्यालयातील नरेगा कक्षात कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी

एटापल्ली : येथील पंचायत समिती कार्यालयातील नरेगा कक्षात कंत्राटी पदावर कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्याच्या शासकीय निवासस्थानी जबरदस्तीने प्रवेश करून धुडगूस घातल्या प्रकरणात एटापल्ली पोलिसांनी नागपूर येथील एका प्रादेशिक दैनिकाच्या एटापल्ली तालुका प्रतिनिधीला अटक केल्याची घटना शुक्रवारी घडली. एटापल्ली येथील पं.स.मध्ये कार्यरत महिला कर्मचाऱ्याच्या शासकीय निवासस्थानात मंगळवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने सर्व प्रथम दार ठोठावले. मात्र दार न उघडल्यामुळे या इसमाने बळजबरीने दार तोडून आत प्रवेश केला. आतील दाराची साखळी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते शक्य झाले नाही. दार ठोठावण्याच्या आवाजाने जाग्या झालेल्या या महिला कर्मचाऱ्याने शौचालयाचा आधार घेतला. यानंतर मद्यधुंद अवस्थेत घरात शिरलेल्या या अज्ञात इसमाने धुमाकूळ घातला. त्यानंतर शौचालयाचाही दार उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. त्यामुळे तो घराबाहेर निघून गेला. त्यानंतर सदर भयभीत झालेल्या या कर्मचारी महिलेने सभोवतालच्या महिलांना घडलेल्या या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी येथे चौकशी करून मोबाईल व चप्पल जप्त केली. त्यानंतर संबंधित कर्मचारी महिलेने या प्रकरणाची तक्रार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर एटापल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात गती आणली. एसडीपीओंच्या निर्देशानंतर आरोपीला शोधण्याच्या कामात लागले . दरम्यान महिलेला त्रास देणाऱ्या संबंधित इसमावर गुन्हे दाखल करून तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला पदाधिकारी सुशीला रच्चावार, रेणुका शेंडे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजगोपाल सुलभावार, पं.स. सभापती दीपक सोनटक्के, नगरसेविका सुनीता चांदेकर, नगरसेवक विजय नल्लावार, भाजपाचे पदाधिकारी बाबुराव गंप्पावार, अशोक पुल्लुरवार, काँग्रेसचे पदाधिकारी डॉ. ईश्वर डोके, अंचलेश्वर गादेवार यांच्यासह ४० ते ५० महिलांनी एटापल्ली पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी जप्त केलेला मोबाईल इसमाचा आहे, त्याच्यावर तत्काळ गुन्हे दाखल करून अटक करावी, अशी मागणी लावून धरली. महिलांचा आक्रमक पवित्रा पाहून एटापल्ली पोलिसांनी अखेर जप्त केलेला मोबाईल असलेल्या विनोद चव्हाणवर गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. (तालुका प्रतिनिधी)