शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
4
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
5
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
6
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
7
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
8
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
9
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
10
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
11
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
12
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
13
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
14
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
15
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
16
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
17
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
18
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
19
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
20
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 

मार्र्कं डा यात्रेसाठी नियोजन पूर्ण

By admin | Updated: January 6, 2016 01:55 IST

६ मार्चपासून मार्र्कं डा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला प्रारंभ होत आहे. या यात्रेच्या नियोजनाचे काम प्रशासनाने सुरू केले असून सोमवारी मार्र्कंडा येथे पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली.

महाशिवरात्रीला यात्रा : डिझेलच्या दिव्यांनी परिसर होणार प्रकाशमानचामोर्शी : ६ मार्चपासून मार्र्कं डा येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेला प्रारंभ होत आहे. या यात्रेच्या नियोजनाचे काम प्रशासनाने सुरू केले असून सोमवारी मार्र्कंडा येथे पूर्वनियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीला अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, मार्र्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, सहसचिव रामुजी तिवाडे, कोषाध्यक्ष पा. गो. पांडे, रामप्रसाद महाराज, धर्मशाळेचे सचिव केशव आंबटवार, तहसीलदार यू. जी. वैद्य, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, वनपरिक्षेत्राधिकारी अभय ताल्हन, पोलीस उपनिरीक्षक माने, महावितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता डी. बी. कुंभरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किशोर ताराम, बांधकाम विभागाचे अभियंता गावळ, कक्ष अधिकारी वि. रा. कागदेलवार, मार्र्कंडाच्या सरपंच ललीता मरस्कोल्हे, रेवनाथ कुसराम, साईनाथ बुरांडे, जयराम चलाख, दिलीप चलाख, मंडल अधिकारी बोदलकर, तलाठी शेडमाके, भरडकर, ग्रा. पं. सचिव दिनेश सराटे आदी उपस्थित होते. यात्रेच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरूस्ती करावी, ग्रामपंचायतकडून शुद्ध पाणी उपलब्ध होण्याबाबत नियोजन करण्यात यावे, आरोग्य विभागाकडून यात्राकाळात २४ तास आरोग्य सेवा तसेच महावितरण कंपनीकडून विद्युत पुरवठ्याची व्यवस्था सुरळीत ठेवण्याबाबत नियोजन पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. तसेच यात्राकाळात अधिक बसगाड्यांची व्यवस्था तसेच आपत्ती व्यवस्थापनाकडून डिझेलवर चालणारे १० दिवे ज्यामुळे संपूर्ण मार्र्कं डानगरी प्रकाशमान होईल, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेची जबाबदारी पार पाडली जाणार असून जि. प. व पं. स. प्रशासनाकडून मोबाईल, शौचालय, बाथरूम यांची व्यवस्था करण्यात येणार आहे, आदीबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. १४ जानेवारीला नियोजनाची दुसरी बैठक घेतली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)