लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : आदिवासी कंवर समाज सेवा संस्था खडकाघाट (सोेहले) क्षेत्र कोरचीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन कोरची येथील राजीव भवनात करण्यात आले. या विवाह सोहळ्यात ४० जोडपे विवाहबद्ध झाले.या विवाह सोहळ्याला खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, सुखीराम कंवर, कोरची नगर पंचायतीचे अध्यक्ष नसरूद्दीन भामानी, कमलनारायण खंडेलवार, आनंद चौबे, चांगदेव फाये, राम लांजेवार, कुरखेडाचे पंचायत समिती सभापती गिरीधर तितराम, स्वप्नील वरघंटे, भरत दुधनाग, श्रीराम चौरे, डॉ. मेघराज कपूर, कोरची पंचायत समितीच्या सभापती कचरीबाई काटेंगे, सदाराम नरोटी, प्रा. देवराव गजभिये तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या लग्नसमारंभात आलेल्या सर्व जोडप्यांना विविध प्रजातीची रोपटे भेट देण्यात आली. विवाह सोहळ्याच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.यावेळी मार्गदर्शन करताना खा. अशोक नेते यांनी दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे वधू व वरांचे लाखो रूपये लग्न समारंभात खर्च होतात. सामूहिक विवाह सोहळा खर्च बचतीचा सर्वाधिक चांगला उपाय आहे. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून समाजातील नागरिक एकत्र येत असल्याने एकोपा निर्माण होण्यास मदत होते, सामूहिक विवाह सोहळे अधिकाधिक होतील, यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले. सामूहिक विवाह सोहळा असतानाही कंवर समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे विवाह सोहळा पार पाडण्यात आला. येथील व्यवस्थेची उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
कोरचीत ४० जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:10 IST
आदिवासी कंवर समाज सेवा संस्था खडकाघाट (सोेहले) क्षेत्र कोरचीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन कोरची येथील राजीव भवनात करण्यात आले. या विवाह सोहळ्यात ४० जोडपे विवाहबद्ध झाले.
कोरचीत ४० जोडपी विवाहबद्ध
ठळक मुद्देकंवर समाजाचा मेळावा : खासदार व आमदारांसह लोकप्रतिनिधींची हजेरी