शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरीच्या आमदाराचे नाव वगळले

By admin | Updated: September 27, 2015 01:01 IST

२ आॅक्टोबर रोजी गोंडवाना विद्यापीठाचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.

२ आॅक्टोबरला आयोजन : विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रम पत्रिकेतूनगडचिरोली : २ आॅक्टोबर रोजी गोंडवाना विद्यापीठाचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांचे नाव विद्यापीठाच्या प्रशासनाने वगळल्यामुळे राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गोंडवाना विद्यापीठाच्या प्रशासनाने हा प्रकार हेतुपुरस्सर केला की काय याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २ आॅक्टोबरला गोंडवाना विद्यापीठाच्या चौथ्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या नावाचा उल्लेखही निमंत्रण पत्रिकेवर करण्यात आला आहे. मात्र जिल्ह्यातील असूनही आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांना निमंत्रितांमधूनही वगळण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदर्श समाज भूषण पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य, उत्कृष्ट शिक्षक, आदर्श अधिकारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीला विद्यापीठाने कार्यक्रमातून वगळल्यामुळे राजकीय वर्तुळात याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. यासंदर्भात कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांना विचारणा केली असता विद्यापीठ मुख्यालय असलेल्या क्षेत्रातील आमदार व खासदारांचे नाव पत्रिकेत टाकण्यात आले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या आमदारांचे नाव टाकले असते तर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच आमदार व खासदारांचे नाव घालावे लागले असते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ‘शॉट बट स्वीट’ असा हा तोडगा काढला आहे. आमदार क्रिष्णा गजबे यांना निमंत्रण दिले जाणार आहे. ते आले तर विद्यापीठ प्रशासन योग्य तो सन्मान करेल, असेही डॉ. इरपाते यांनी स्पष्ट केले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)