आरमोरी तालुक्यातील एकूण ३२ ग्रामपंचायतीपैकी २९ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक १२, १५ व १६ फेब्रुवारी अशा तीन टप्प्यात आखण्यात आला. १५ फेब्रुवारीला तालुक्यातील दुसऱ्या टप्प्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणूक आरमोरीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी नेमून दिलेल्या अध्याशी अधिकाऱ्यांनी घेतली. आरमोरी तालुक्यातील देऊळगाव, डोंगरगाव (भु.), देलोडा (बु.), पळसगाव, चुरमुरा, सिर्सी, शंकरनगर, कासवी, कुलकुली, चामोर्शी (माल), किटाळी, वैरागड, पिसेवडधा आदी १३ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाची निवडणूक ठरली होती. परंतु पिसेवडधा ग्रामपंचायतीत कोरम पूर्ण न झाल्याने स्थगिती देण्यात येऊन १६ ला निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील १२ ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड करण्यात आली. देऊळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शामादेवी कवळू सहारे तर उपसरपंचपदी वंदना राजेंद्र कामतकर, डोंगरगाव(भु.) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी छाया भास्कर खरकाटे तर उपसरपंचपदी लोमेश लक्ष्मण सहारे, देलोडा (बु.)च्या सरपंचपदी दामाजी सीताराम हुलके तर उपसरपंचपदी प्रमोद ईश्वर भोयर, पळसगावच्या सरपंचपदी जयश्री त्र्यंबक दडमल तर उपसरपंचपदी सोनी गणेश गरफडे , चुरमुराच्या सरपंचपदी ईश्वर डोमाजी कुळे तर उपसरपंचपदी मोतन विलास कांबळे, सिर्सीच्या सरपंचपदी खुशाल जानू वलादी तर उपसरपंचपदी दर्शना सुधाकर बोबाटे, शंकरनगरच्या सरपंचपदी देवदास भूपती ढाली तर उपसरपंचपदी मल्लिक तपण गोलक, कासवीच्या सरपंचपदी सतीश आनंदराव गुरनुले तर उपसरपंचपदी प्रवीण केवळराम ठेंगरी, कुलकुलीच्या सरपंचपदी विलास सखाराम बावणे तर उपसरपंचपदी बादलशाह सुखराम मडावी,चामोर्शी मालच्या सरपंचपदी ज्ञानेश्वर नानाजी धारणे तर उपसरपंचपदी भाग्यशीला मुखरू गेडाम, किटाळीच्या सरपंचपदी राजेश कैलास लिंगायत तर उपसरपंचपदी बाबा रामचंद्र नरुले, वैरागडच्या सरपंचपदी बबिता पेंदाम तर उपसरपंचपदी भास्कर बोडणे यांची निवड करण्यात आली.
आरमोरी तालुक्यातील उर्वरित कोरेगाव(रांगी), पिसेवडधा, बोरीचक आदी ३ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचाची
निवडणूक १६ फेब्रुवारीला होणार आहे.