शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरमोरी नगर पंचायतीचे भिजत घोंगडे कायमच

By admin | Updated: January 30, 2017 03:36 IST

शासनाच्या निर्णयानुसार दीड वर्षापूर्वी आरमोरी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले. त्यानंतर आरमोरी

विकासकामांना बसली खीळ : नगर पंचायत की नगर परिषद? निर्मितीचा चेंडू कोर्टात महेंद्र रामटेके ल्ल आरमोरी शासनाच्या निर्णयानुसार दीड वर्षापूर्वी आरमोरी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले. त्यानंतर आरमोरी येथील जिल्हा परिषदेचे एक व पंचायत समितीचे दोन असे तीन क्षेत्र गोठविण्यात आले. ऐन नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर आरमोरी नगर पंचायतीला नगर परिषदेचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आरमोरी शहरातील काही राजकीय मंडळींनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करून नगर पंचायतीच्या निवडणुकीला स्थगिती आणली. तेव्हापासून आरमोरी नगर परिषद होणार की नगर पंचायत राहणार याबाबतचा चेंडू कोर्टात लटकलेला आहे. नगर पंचायतीची निवडणूक न झाल्याने आरमोरी नगर पंचायतीची विकास कामे ठप्प झाली असून ही नगर पंचायत सध्या वांझोटी झाली आहे. एक तर नगर पंचायतीची निवडणूक नाही आणि दुसरीकडे जि.प.चे एक व पं.स.चे दोन क्षेत्र गोठविण्यात आले. मागील निवडणुकीच्या आठवणी ताज्या होऊन मतदान करता येणार नसल्याचे शल्य आरमोरीकरांच्या मनात बोचत आहे. शिवाय आरमोरी शहर हे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची खाण आहे. अशा स्थितीत स्थानिक नगर पंचायत क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना दुसऱ्या जि.प. क्षेत्रातून निवडणुका लढविता येत नसल्याचे दुखही पदाधिकाऱ्यांच्या मनात सतावत आहे. आरमोरी ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळाला तेव्हापासून शहरात विविध मूलभूत सुविधांचा डोंगर निर्माण झाला आहे. नगर पंचायतीची निवडणूक न झाल्यामुळे नगर पंचायतीचा कारभार सांभाळण्यासाठी तहसीलदारांकडे प्रशासकाचा कार्यभार सोपविण्यात आला. पाच-सहा महिन्यापूर्वी नगर पंचायतीला मुख्याधिकारी देण्यात आला. मात्र शहर विकासासाठी नगर पंचायतीला येणारा निधी योग्य व पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने विकास कामाला मोठ्या प्रमाणात खिळ बसली आहे. राजकारणाचे केंद्रबिंदू म्हणून आरमोरीची ओळख जिल्ह्यात सर्वत्र आहे. आरमोरी नगर पंचायत होण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून आरमोरीकडे पाहिले जात होते. मात्र आरमोरी शहराच्या विकासासाठी असलेला जि.प. व पं.स. क्षेत्र गोठविण्यात आल्याने तसेच नगर पंचायत होऊनही निवडणूक न झाल्याने दुसऱ्या क्षेत्राच्या निवडणुका पाहणे तसेच चर्चा करण्यापलिकडे काहीच न करण्याची पाळी येथील राजकीय पदाधिकाऱ्यांवर आली आहे. हे आरमोरीकरांचे दुदैवच म्हणावे लागेल. आरमोरी नगर परिषद निर्मितीमध्ये लोकसंख्येचा अडथळा निर्माण होत आहे. नगरसेवकांअभावी जनता झाली पोरकी ४आरमोरी शहरात रस्ते, वीज, स्वच्छता व पाणी यासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रशासकांना वेळ मिळत नाही व मुख्याधिकारी प्रत्येक गोष्टींकडे लक्ष देऊ शकत नाही. निवडणुका झाल्या असत्या तर त्या-त्या प्रभागातील नगरसेवक आपल्या वार्डातील मूलभूत सुविधा मांडून त्या निकाली काढण्याचा प्रयत्न झाला असता. मात्र वार्डातील समस्या कोणाला सांगाव्या, अशी स्थिती आरमोरीकरांची झाली आहे.