शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

बँक शाखेत लिपिकाची नियुक्ती करा

By admin | Updated: October 24, 2015 01:15 IST

दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पोटेगाव येथे एक शाखा व्यवस्थापक कार्यरत असून एक परिचर आहे.

पोटेगाव ग्रामसभेत ठराव पारित : ग्राहकांच्या गैरसोयीच्या मुद्यावर झाली चर्चापोटेगाव : दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पोटेगाव येथे एक शाखा व्यवस्थापक कार्यरत असून एक परिचर आहे. पोटेगाव शाखेअंतर्गत अनेक गावांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे येथे आलेल्या ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी तासणतास थांबावे लागते. सदर मुद्दा पोटेगाव येथे १३ आॅक्टोबर रोजी सरपंच ओमकारेश्वर सडमाके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत उपस्थित करण्यात आला. त्यानंतर पोटेगावच्या बँक शाखेत एका लिपिकाची नियुक्ती करण्यात यावी, असा ठराव पारित करण्यात आला. या ठरावाची प्रत गडचिरोली येथील बँकेच्या मुख्य शाखेला ग्रा. पं. पदाधिकाऱ्यांनी सादर केली आहे. पोटेगाव बँक शाखेतील एका लिपिकाची यापूर्वी इतर शाखेत बदली करण्यात आली. तेव्हापासून या बँक शाखेचा कारभार एका व्यवस्थापकावर आहे. येथे दररोज ४० गावांतील हजारो खातेदार येऊन आर्थिक व्यवहार करतात. विविध शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांची याच शाखेत खाते आहेत. पुरेशा कर्मचाऱ्याअभावी वयोवृद्ध निराधारांना कामासाठी दिवसभर बँक शाखेत राहावे लागते. त्यामुळे या ठिकाणी एका लिपिकाची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली. या ग्रामसभेला ग्रा. पं. सदस्यांसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)