लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा नंतर मृत्यू झालेल्या सर्व राज्य शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमधील शिक्षक, कर्मचारी, अधिकाºयांसाठी जुनी पेंशन योजना लागू करावी, या मुख्य मागणीसाठी महाराष्टÑ राष्टÑ प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वात शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी धरणे आंदोलन केले.राज्य शासनाच्या ३१ आॅक्टोबर २००५ च्या शासन निर्णयानुसार १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाºयांसाठी प्रचलित सेवानिवृत्ती योजना, कुटुंब निवृत्ती योजना आणि भविष्य निर्वाह निधी योजना बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी परिभाषित व अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना शाश्वत व खात्रीशिर निवृत्ती वेतन देणारी नसून निवृत्ती पश्चात नोकरदारांना अंधाराच्या गर्तेत लोटणारी आहे. त्यामुळे सदर पेंशन योजना बंद करून जुनी पेंशन योजना लागू करावी, या मुख्य मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष धनपाल मिसार, नरेंद्र कोत्तावार, लालचंद धाबेकर, रमेश रामटेके, मायाताई दिवटे, योगेश ढोरे, अरूण पुण्यप्रेड्डीवार, हेमंत मेश्राम, राकेश सोनटक्के, इरशाद शेख, अमरसिंग गेडाम, खिरेंद्र बांबोळे, जयंत राऊत, राजेश बाळराजे, लक्ष्मण गद्देवार, डंबेश पेंदाम, नरेश चौधरी, जीवन शिवणकर, मेघराज बुराडे, शिवाजीराव जाधव, मनोज रोकडे, रवींद्र वासेकर, गुरूदेव नवघडे, अशोक बोरकुटे, रेमाजी चरडुके, दशरथ पाटील, वनश्री जाधव, नीलेश शेंडे, विठ्ठल होंडे, नरेश जाम्पलवार, आशिष जयस्वाल, केशव पर्वत, गुरूदेव कापगते, अविनाश पत्तीवार, बंडू सिडाम, विलास दर्डे, प्रशांत काळे, सचिन मेश्राम, नेतराम मलगाम, शेषराव संगीडवार, एस. एस. मलमपल्ली, व्ही. आर. येतम, प्रभाकर गडपायले, गुलाब मने, वैशाली कोरडे, जीवन शिवणकर यांनी केले.आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:22 IST
१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा नंतर मृत्यू झालेल्या सर्व राज्य शासकीय, निमशासकीय आणि अनुदानित संस्थांमधील शिक्षक, कर्मचारी, अधिकाºयांसाठी जुनी पेंशन योजना लागू करावी,
कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करा
ठळक मुद्देशेकडो शिक्षकांचा सहभाग : महाराष्टÑ राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा पुढाकार