शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नच्चिपन समितीच्या शिफारसी लागू करा

By admin | Updated: September 25, 2016 01:47 IST

ओबीसींच्या उत्थानासाठी नच्चिपन समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे,

ओबीसींचा मेळावा : जिल्ह्यात विधानसभेसाठीही ओबीसीला संधी मिळावीचामोर्शी : ओबीसींच्या उत्थानासाठी नच्चिपन समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्या, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसींना जिल्ह्यातून विधानसभेची जागा आरक्षित करावी, यासह ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी मोठे आंदोलन उभे करण्याकरिता चामोर्शी येथे ओबीसी समाज संघटनेच्या वतीने ओबीसींचा विशाल मेळावा शनिवारी घेण्यात आला. यावेळी मंचावर प्रमुख वक्ते म्हणून ओबीसी फेडरेशनचे संयोजक बळीराज धोटे होते. अध्यक्षस्थानी प्रा. राम वासेकर, विशेष अतिथी म्हणून अशोक मांदाळे, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहूल नैताम, पं.स. सभापती शशिकला चिळंगे, उपसभापती मंदा दुधबावरे, पं.स. सदस्य प्रमोद भगत, जि.प. सदस्य संध्या दुधबळे, सोनाली वरगंटीवार, पं.स. सदस्य केशव भांडेकर, सुरेंद्र सोमनकर, नुमचंद भिवनकर, भाजपचे चामोर्शी तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, प्रा. रमेश बारसागडे, कालिदास बुरांडे, तेली समाज संघाचे गजानन भांडेकर, कुणबी समाज संघाचे गोहणे, माळी समाज संघाचे सुनिल कावळे, पांचाळ समाज संघाचे कागदेलवार तसेच नगर पंचायतीचे सभापती विजय शात्तलवार, नगरसेवक वैभव भिवापुरे अवी चौधरी, प्रशांत एगलोपवार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बळीराज धोटे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ओबीसी लोकांवर शासनकर्त्यांकडून प्रचंड अन्याय होत आहे. ओबीसी समाजाने आरक्षणासाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करणे आवश्यक आहे. त्यासाठी ओबीसींची संघटना मजबूत झाली पाहिजे, असे धोटे यावेळी म्हणाले. याप्रसंगी प्रा. राम वासेकर यांनीही मार्गदर्शन केले.यशस्वीतेसाठी मारोती दुधबावरे, दिनेश चुधरी, सदाशिव मेश्राम, बोबाटे, कुनघाडकर, आदे, जुवारे, भोवरे, बारसागडे, ठाकरे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोती दुधबावरे, संचालन गोकुलदास झाडे यांनी केले तर आभार कालिदास बुरांडे यांनी मानले. छत्रपती शिवरायांचा द्वितीय राज्यभिषेक दिन, सत्यशोधक समाजस्थापना दिन व पेरियार रामास्वामी जयंतीचे औचित्य साधून ओबीसी समाज संघटना चामोर्शीच्या वतीने नगर पंचायत भवनात घेण्यात आलेल्या सदर प्रबोधन कार्यक्रमास चामोर्शी शहरासह तालुक्यातील ओबीसी बांधव, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)