शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा विरोधी पक्षात बसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:23 IST

लोकप्रतिनिधींना पाच वर्ष सेवा केल्यावर पेंशन दिले जाते. तर ३५ वर्ष सेवा देणाºया शासकीय कर्मचारी व शिक्षकांना पेंशन नाकारली जात असेल तर हा त्यांच्यावरील फार मोठा अन्याय आहे. जुनी पेंशन योजना लागू करा अन्यथा विरोधी पक्षात बसण्याची तयारी करा,.....

ठळक मुद्दे चामोर्शीत कार्यक्रम : शिक्षक परिषदेच्या जिल्हा अधिवेशनादरम्यान मान्यवरांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : लोकप्रतिनिधींना पाच वर्ष सेवा केल्यावर पेंशन दिले जाते. तर ३५ वर्ष सेवा देणाºया शासकीय कर्मचारी व शिक्षकांना पेंशन नाकारली जात असेल तर हा त्यांच्यावरील फार मोठा अन्याय आहे. जुनी पेंशन योजना लागू करा अन्यथा विरोधी पक्षात बसण्याची तयारी करा, असा सूर शिक्षक परिषदेच्या जिल्हा अधिवेशनादरम्यान उपस्थित असलेल्या मान्यवरांनी व्यक्त केला.महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेचे चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या प्रांगणात जिल्हा अधिवेशन रविवारी पार पडले. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे नागपूर विभागाचे अध्यक्ष के. के. वाजपेयी होते. उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आ. नागो गाणार उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राथमिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष सत्यम चकीनारप, प्राचार्य हिराजी बनपूरकर, उपशिक्षणाधिकारी संजय भिलकर, रवी बोमनवार, प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, दिलीप चलाख, नत्थुजी पाटील, नागपूर विभागाचे मेहेर, चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष मधुकर मुप्पीडवार, प्रा. रमेश बारसागडे उपस्थित होते.आ. नागो गाणार यांनी शिक्षण क्षेत्रात वाढलेल्या भ्रष्टाचाराबाबत चिंता व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यातील बोगस शिक्षक प्रकरणाचा पाठपुरावा केल्याने या प्रकरणातील अधिकारी व कर्मचारी निलंबित झाले आहेत. शिक्षण क्षेत्रात अर्थ समजून न घेतलेल्या अधिकारी वर्गाला चौकात फटके मारले पाहिजे. शौैचालयाच्या बांधकामाचा निधी हडप करणाºया शासकीय अधिकाºयांना शिक्षण क्षेत्रावर बोलण्याचा अधिकार नाही. जुनी पेंशन योजना मागच्या सरकारने बंद केली होती. तोच निर्णय विद्यमान सरकारही कायम ठेवणार असेल तर या सरकारलाही घरी बसावे लागेल. राजकारणात शिक्षण चालेल मात्र शिक्षणात राजकारण आणू नये, असे आवाहन आ. नागो गाणार यांनी केले. या जिल्हा अधिवेशनाला जवळपास ४०० शिक्षक उपस्थित होते.प्रास्ताविक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार, अहवाल वाचन कार्यवाह गोपाल मुनघाटे, प्रमोद खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी आ. डॉ. देवराव होळी, स्वागताध्यक्ष प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, सत्यम चकीनारप, प्राचार्य बनपूरकर यांनीही मार्गदर्शन केले. संचालन सविता सादमवार यांनी केले. समारोपीय कार्यक्रमाला खा. अशोक नेते व स्वप्नील वरघंटे यांनी उपस्थित दर्शविली. उपस्थितांचे आभार जिल्हाध्यक्ष अविनाश तालापल्लीवार यांनी मानले.