शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

ओपन स्पेसला डबक्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूच्या संसर्ग देशात व महाराष्ट्रात होत असल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक व परिसर स्वच्छता राखावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनासह सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने सांडपाणी विल्हेवाटीचा व घाणीच्या साम्राज्याच्या प्रश्नाकडे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देनालीचा अभाव : घाणीच्या साम्राज्याने कन्नमवार नगरातील नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील कन्नमवार नगरात रिलायन्स टॉवरलगत नगर पालिकेचे ओपन स्पेस आहे. मात्र या ओपन स्पेसलगत नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे या ओपन स्पेसला डबक्याचे स्वरूप आले असून घाणीच्या साम्राज्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.कोरोना विषाणूच्या संसर्ग देशात व महाराष्ट्रात होत असल्याने आरोग्य व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक व परिसर स्वच्छता राखावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनासह सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे गडचिरोली नगर पालिका प्रशासनाने सांडपाणी विल्हेवाटीचा व घाणीच्या साम्राज्याच्या प्रश्नाकडे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.कन्नमवार नगरात रिलायन्स कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरलगत वेगवेगळे दोन ले-आऊट आहे. या ले-आऊटमध्ये ओपन स्पेस असून आजूबाजूला घरांची वस्ती आहे. कन्नमवार नगरात घरातील सांडपाणी तसेच पावसाच्या पाण्याच्या विल्हेवाटीचा मोठा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून कायम आहे. विवेकानंद नगरातून वृद्धाश्रमापासून जंगलातील पाणी कन्नमवार नगरातील याच मार्गाने चामोर्शी रोड, केमिस्ट भवन पासून अयोध्यानगरकडे नाल्याद्वारे निघतो. येथून शहराच्या बाहेर शेतात जातो. मात्र पाण्याच्या या मार्गाला कन्नमवार नगरातून योग्यरित्या मोठी नाली बांधण्यात आली नाही. रिलायन्स पेट्रोलपंपापासून मोठी नाली बांधून ती अलिकडच्या मार्गाच्या मोठ्या नालीला जोडणे आवश्यक आहे. रिलायन्स कंपनीच्या टॉवरजवळ पाईप टाकून भूमिगत नाली करता येणे शक्य आहे. तशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नागरिकांची आहे. मात्र नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.टॉवरजवळून भूमिगत नाली करून लगतचे ओपन स्पेस विकसित केल्यास या भागात घाणीचे साम्राज्य राहणार नाही. घाणपाण्याचे डबके तयार होणार नाही. मात्र हे सर्व करण्यासाठी नगराध्यक्ष योगीता पिपरे, मुख्याधिकारी संजीव राठोड यांच्यासह वॉर्डाचे नगरसेवक सतीश विधाते, नगरसेविका लता लाटकर यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.पावसाळा सुरू होण्यापूर्वी पालिकेने सदर भागात भूमिगत नाली करून ओपन स्पेस विकसित करावे, अशी मागणी या नगरातील रहिवासी धनंजय दुमपट्टीवार, भाऊसाहेब कुंठेवार, श्रीकृष्ण अर्जुनकर यांच्यासह अनेक नागरिकांनी केली आहे.डुकरांचा हैदोस व डासांचा प्रादुर्भावटॉवरच्या परिसरात घाणपाण्याचे डबके तयार असून येथे कचरा वाढला आहे. या ठिकाणी डुकरांचा हैदोस राहत असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कन्नमवार नगरात शिक्षक निशाने यांच्या घरासमोर नव्यानेच ओपन स्पेस तयार झाले आहे. या ओपन स्पेसलगतच्या नालीतून पावसाचे पाणी व सांडपाणी वाहून जाते. मात्र सदर भागात दुसऱ्या ओपन स्पेस व रिलायन्स टॉवरच्या भागातून पाण्याचा लोंढा येतो. परिणामी विकसित झालेल्या ओपन स्पेसच्या परिसरातील मार्गावर पावसाळ्यात प्रचंड पाणी असते. वरवर उपाययोजना करण्यापेक्षा प्रश्नाचा मूळ शोधून टॉवरच्या परिसरात भूमिगत नाली केल्यास हा प्रश्न निकाली निघू शकतोे.

टॅग्स :corona virusकोरोना