शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

आणखी १८० युवक-युवतींना पोलिसांमार्फत रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाइल, सुरक्षा रक्षक व नर्सिंग असिस्टंट म्हणून आजपर्यंत १६६९ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासोबतच ब्युटीपार्लर ३५, मत्स्यपालन २५, कुक्कुटपालन ३, शेळीपालन ६७, शिवणकाम ३५, अशा १९७ बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ठळक मुद्देपोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणांचा लाभ

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरी कृती शाखेंतर्गत राबविले जात असलेले रोजगारविषयक कार्यक्रम दुर्गम भागातील युवक- युवतींसाठी आशेचा किरण ठरत आहे. याअंतर्गत विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून आणखी १८० युवक- युवतींना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी (दि.११) पोलीस मुख्यालयातील एकलव्य धाम येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात आणखी १८० युवक- युवतींना वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीची संधी देणारे नियुक्तीपत्र जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया (ऑपरेशन), समीर शेख (प्रशासन), सोमय मुंडे (अहेरी उपमुख्यालय) यांच्यासह प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे प्रमुख आशिष इंगळे, रिजनल अकॅडेमिक हेड (हॉस्पिटॅलिटी) भाग्यश्री देशमुख उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रभारी अधिकारी आणि नागरी कृती शाखेचे एपीआय महादेव  शेलार  आदींनी  परिश्रम  घेतले.

व्यावसायिक प्रशिक्षणातून बेराेजगारांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाइल, सुरक्षा रक्षक व नर्सिंग असिस्टंट म्हणून आजपर्यंत १६६९ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासोबतच ब्युटीपार्लर ३५, मत्स्यपालन २५, कुक्कुटपालन ३, शेळीपालन ६७, शिवणकाम ३५, अशा १९७ बेरोजगारांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.कुटुंबीयांचे राहणीमान उंचवावे- यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक गोयल यांनी जिल्ह्यातील बेरोजगार युवक- युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर असून, तुमच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही दिली. तुमचे मित्र, आप्तस्वकीय यांनादेखील रोजगाराबाबत माहिती देऊन पोलीस दलाने दिलेल्या या संधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

टॅग्स :Policeपोलिसjobनोकरी