शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवाद्यांकडून मुख्यमंत्र्यांवर निवेदनांचा वर्षाव

By admin | Updated: November 26, 2014 23:06 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ आॅक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदा आले असताना त्यांना विदर्भवादी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना व राजकीय

गडचिरोली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २४ आॅक्टोबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदा आले असताना त्यांना विदर्भवादी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांतर्फे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यात यावे, या विषयावर शेकडो निवेदन देण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा विदर्भवाद्यांच्या निवेदनानीही चर्चेचा विषय ठरला.भारतीय जनता पक्ष छोट्या राज्याच्या निर्मितीचे समर्थन करणार आहे. यापूर्वीही भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्य केले, असे ठोस आश्वासन जनतेला दिले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा आपल्या जाहीरनाम्यात समाविष्ट केला नाही. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजप विदर्भ राज्याच्या निर्मितीपासून फारकत घेत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळेच पहिल्यांदा गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्री आले असताना या जिल्ह्यातील तमाम विदर्भवादी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलीत. यात स्वतंत्र विदर्भ राज्य तातडीने निर्माण करावे, अशी मागणी करण्यात आली. यासोबतच अहेरी हा स्वतंत्र जिल्हाही निर्माण करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. भारतीय जनता पक्षाने नाग विदर्भ आंदोलन समितीसोबत लोकसभा निवडणुकीतच आघाडी केली. भाजपच्या तिकीटावर नाविसचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज आमदार म्हणून निवडून आलेत. महाराष्ट्र राज्यात गडचिरोलीच्या विकासाकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. स्वतंत्र विदर्भ झाल्यास आपल्या भागाला न्याय मिळेल, अशी येथील जनतेची धारणा आहे. त्यामुळेच विदर्भवाद्यांनी मुख्यमंत्र्यांवर निवेदनाचा पाऊस पाडला. अखेरीस मुख्यमंत्र्यांना भारतीय जनता पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी कटिबध्द असल्याचे स्पष्ट केले. विभाजन करून राज्य निर्मिती होत नाही. तर स्वतंत्र राज्य निर्माण करावे लागते, असेही मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांशी बोलताना गडचिरोलीत म्हणाले. विदर्भ राज्य निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी दिला. एकूणच मुख्यमंत्र्यांचा हा दौरा विदर्भवाद्यांच्या निवेदनानेच चर्चेत राहिला. (जिल्हा प्रतिनिधी)