शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नगरविकास सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:23 IST

नगर पंचायतीच्या वतीने नगर विकास सप्ताहानिमित्त १६ ते २० एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धा व उपक्रम राबविण्यात आले. या सप्ताहाच्या अनुषंगाने २१ एप्रिलला सायंकाळी ४.३० वाजता समारोपीय कार्यक्रम नगर पंचायत कार्यालयाच्या सभागृहात पार पडला.

ठळक मुद्देनगरपंचायतीचा पुढाकार : सिरोंचात विविध स्पर्धांसह राबविले उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : नगर पंचायतीच्या वतीने नगर विकास सप्ताहानिमित्त १६ ते २० एप्रिलदरम्यान विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान विविध स्पर्धा व उपक्रम राबविण्यात आले. या सप्ताहाच्या अनुषंगाने २१ एप्रिलला सायंकाळी ४.३० वाजता समारोपीय कार्यक्रम नगर पंचायत कार्यालयाच्या सभागृहात पार पडला.समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका ईश्वरी बुद्धावार होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्याधिकारी भारत नंदनवार, प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक रवी रालबंडीवार, सतीश भोगे उपस्थित होते. भारत नंदनवार यांनी प्रास्ताविकातून सांगितले की, नगर सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. १७ एप्रिलला वॉर्डसभा, १८ ला प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अनेक दुकानातून १६० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. १९ ला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात विजयी ठरलेल्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, असे सांगितले. या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. नगर पंचायतीच्या माध्यमातून शहरात विविध विकास कामे केली जात आहेत. याकरिता नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन केले.या कार्यक्रमाला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थिनी, नगर पंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अब्दुल एजाज यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नगर पंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.यांचा झाला सत्कारनगर पंचायतीच्या वतीने आयोजित सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात स्वच्छता दूत म्हणून माधव राममूर्ती वेनपल्ली यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नगर पंचायतीच्या स्वच्छता कर्मचारी जिलेला देवम्मा व नागराजू सारली कलकोटा यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नगर पंचायतीच्या सार्वजनिक बांधकाम क्षेत्रातून अजिजज खान, अब्बाज खान, कार्यालयीन कामकाज क्षेत्रातील सय्यद जहीर, गोरेमिय्या, वसुली क्षेत्र (गृह पाणीकर) अब्दुल गौसशेख वजीर व स्वच्छ भारत क्षेत्रातून सतीश नानय्या दागम यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.