शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त भूमिहीनांची तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:44 IST

तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायत अंतर्गत साजा क्रमांक १४ मधील वनजमीन, सरकारी आबादी व मिन्हाई गोचर या जमिनीवर जंगल असताना येथे चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमणाची नोंद करून घेतली.

ठळक मुद्देतीन गावातील नागरिक आक्रमक : बोगस अतिक्रमण नोंद रद्द करून पट्टे देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायत अंतर्गत साजा क्रमांक १४ मधील वनजमीन, सरकारी आबादी व मिन्हाई गोचर या जमिनीवर जंगल असताना येथे चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमणाची नोंद करून घेतली. ही संपूर्ण प्रक्रिया बोगस असून अतिक्रमण नोंदी रद्द करून गरीब व गरजूंना जमीन वाटप करावी, या मागणीसाठी तीन गावातील नागरिकांनी जि. प. च्या महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा जनगाम यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर बुधवारी धडक दिली.साजा क्रमांक १४ मध्ये अतिक्रमित जमिनीवरील बोगस नोंदीची योग्य चौकशी करून चौकशीअंती सर्व जमीन सरकार जमा करून सदर जमीन लंबडपल्ली, मुगापूर व मृदूकृष्णापूर या तीन गावातील गरीब व गरजूंना वाटप करावी या मागणीसाठी तिन्ही गावातील नागरिक एकवटले होते. तहसीलदारांमार्फत नागपूर विभागीय आयुक्तांना निवेदन पाठविण्यात आले.पेंटींपाका येथील साजा क्रमांक १४ मध्ये घनदाट जंगल आहे. यात सरकारी आबादी, मिन्हाई गोचर व वनजमीन असून उभ्या जंगलावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नसताना व कोणीही आजपर्यंत जमिनीवर अतिक्रमण केले नसताना अनेकांच्या नावाने अतिक्रमण पंजीत, गाव नकाशा व सातबाºयावर बोगस पद्धतीने अतिक्रमण नोंद केल्याने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.पोचमपल्ली गावा जवळील गोदावरी नदीवर बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पामुळे तिन्ही गावे प्रभावित होणार असल्याने भविष्यात या गावांची पुनर्वसनाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.निवेदन नायब तहसीलदार गोवर्धन गागापूरपुवार यांनी स्वीकारले. निवेदन देताना जि. प. सभापती जयसुधा जनगाम, आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, सल्लागार रवी सल्लमवार, ग्रा. पं. सदस्य सोमय्या गादे, सडवली जनगाम व लंबडपल्ली, मुगापूर, मृदूकृष्णापूर येथील नागरिक हजर होते.

टॅग्स :Morchaमोर्चा