शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय गाठले

By admin | Updated: September 2, 2014 23:45 IST

येथील बाजारात युरिया खत उपलब्ध नसल्याने खत खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली. या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसह खत विक्रेत्यांच्या गोदामाची पाहणी केली असता,

कुरखेडा : येथील बाजारात युरिया खत उपलब्ध नसल्याने खत खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांपुढे अडचण निर्माण झाली. या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांसह खत विक्रेत्यांच्या गोदामाची पाहणी केली असता, या ठिकाणी खत उपलब्ध आढळून आले नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी थेट उपविभागीय कार्यालय गाठले व खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी टोनगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. कुरखेडा तालुक्यात मागील तीन दिवसापासून दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात युरिया खत टाकण्यासाठी लगबग सुरू केली. दरम्यान युरिया खत खरेदीसाठी बाजारपेठेत मंगळवारी गर्दी केली. मात्र बाजारपेठेत खत उपलब्ध नसल्याचे शेतकऱ्यांना दिसून आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पंचायत समितीचे कृषी अधिकारी डफ यांच्यासह खत विक्रेत्यांच्या गोदामाची पाहणी केली. मात्र सदर गोदामसुद्धा रिकामेच दिसून आले. कुरखेडा तालुक्यात खरीप हंगामात १२०० मेट्रीक टन युरिया खताची आपूर्ती करण्यात आली. तर २४ आॅगस्ट रोजी २१९ मेट्रीक टन युरिया खताचा पुरवठा करण्यात आला, अशी माहिती कृषी अधिकारी डफ यांनी शेतकऱ्यांना दिली. मात्र आठवडाभरातच विक्रेत्यांनी उपलब्ध खत मालाची इतरत्र विल्हेवाट लावून बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण केली. बाजारपेठेतील खतविक्रेते तालुक्याबाहेर छत्तीसगड राज्यात व अन्य जिल्ह्यात अवैधरित्या खतविक्री करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे यावेळी केला. या खतविक्रीच्या गोरख धंद्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी श्रावण देशमुख, कुंवर लोकेंद्रशहा महाराज, माजी जि. प. सदस्य दिगांबर मानकर, रहेमान खॉ पठाण, मंगेश कोडाप, अस्लम खॉ आदींसह कुरखेडातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. खतविक्रेत्यांकडून कृत्रिम खताची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांना खतासाठी भटकावे लागत असल्याचेही शेतकऱ्यांनी म्हटले आहे.