शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचारी आंदोलन करणार

By admin | Updated: December 2, 2014 23:07 IST

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार या प्रश्नांचा पाठपुरावा शासनाकडे करण्यात आला. मात्र अद्यापही केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही.

वेतनाचा प्रश्न त्वरित निकाली काढा : १२ ला देणार नागपुरात धडकगडचिरोली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. वारंवार या प्रश्नांचा पाठपुरावा शासनाकडे करण्यात आला. मात्र अद्यापही केंद्र व राज्य सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. यामुळे येत्या १२ डिसेंबर २०१४ रोजी नागपूर अधिवेशनादरम्यान विधिमंडळावर मोर्चा काढला जाईल, असा निर्णय एटापल्ली, मुलचेरा येथील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात घेण्यात आला. अंगणवाडी महिला मेळाव्याला प्रा. रमेशचंद्र दहीवडे उपस्थित होते. एटापल्ली येथे अध्यक्षस्थानी छाया कागदेलवार होत्या. यावेळी लिनीग्रेस केरकट्टा, अनुसया झाडे, वत्सला सुंकेपाकवार, जीजा रामटेके, माधुरी गड्डमवार, लीला गेडाम, सुमन गावडे, बबिता मडावी उपस्थित होत्या. मागील चार महिन्यांपासून अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना मानधन निघाले नाही. त्यामुळे अनेक अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित देण्यात यावे, ४५ व्या श्रम संमेलनात पारित झालेल्या ठरावानुसार अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा, पेंशन देण्यात यावी आदी समस्यांवर चर्चा करण्यात आली. मुलचेरा येथे पार पडलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आलोराणी सरकार होत्या. यावेळी कुसुम नैताम, करूणा बिश्वास, अरूणा आत्राम, प्रमिला कडपे, बेबी पल्लो, ममता फौजदार, बिना पाल, पंचशिला गोंगले, भगवती गाईन, मधुमाला मजुमदार आदी उपस्थित होत्या. ५ डिसेंबरला देशव्यापी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनात महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रा. रमेशचंद्र दहीवडे यांनी केले आहे.