ऑनलाईन लोकमतगडचिरोली : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख समस्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर धडक दिली. मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्री यांना पाठविले.मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार ५ टक्के मानधनवाढीचा आदेश त्वरित काढावा, वाढत्या महागाईनुसार अमृत आहार व इंधन बिलाची रक्कम वाढवून द्यावी, पीएफएमएस प्रणालीद्वारे मानधन दिले जात आहे. ज्या महिन्याचे मानधन दिले जाते, त्या महिन्याचा उल्लेख बँक पासबुकमध्ये करण्यात यावा, जिल्हा परिषद शाळेप्रमाणे अंगणवाडीला उन्हाळ्यात सुटी द्यावी, थकीत मानधन, प्रवास भत्ता दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत द्यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जनश्री विमा योजनेचा लाभ द्यावा, मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर अंगणवाडीत करावे, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मासिक तीन हजार रूपये पेंशन द्यावे आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धडक दिली.आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे राज्य सचिव देवराव चवळे, राधा ठाकरे, मीनाक्षी झोडे, रूपा पेंदाम, जहारा शेख, रेखा जांभुळे, मीरा पुरंजेकर, कौशल्या गोंधोळे, ज्योती कोमलवार, शिवलता बावनथडे, दुर्गा कुर्वे, अनिता अधिकारी, आयशा शेख, शशिकला धात्रक, बसंती अंबादे, कुंदा बंडावार आदींनी केले.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 01:10 IST
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख समस्या सोडविण्यात याव्या, या मागणीसाठी जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर धडक दिली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची धडक
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : आश्वासनानुसार मानधनात वाढ करा