शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांनी जुने १८७ मोबाइल केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:37 IST

शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोबाइलची स्थिती अतिशय खराब झाली आहे. त्याची वाॅरंटी संपलेली आहे. मोबाइल गरम होतो, हँग होतो, ...

शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मोबाइलची स्थिती अतिशय खराब झाली आहे. त्याची वाॅरंटी संपलेली आहे. मोबाइल गरम होतो, हँग होतो, बंद पडतो तसेच वारंवार बिघाड येतो. सदर मोबाइल दुरुस्त केल्यास त्याचा खर्च अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच भरावा लागताे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी माेबाइलमध्ये पुरेसा स्पेस शिल्लक नाही. त्यामुळे कालबाह्य झालेले मोबाइल परत घेण्याच्या मागणीसाठी आयटकच्या वतीने बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात आयटकचे अध्यक्ष देवराव चवळे, कामगार नेते डॉ. महेश कोपुलवार, मीनाक्षी सेलोकर, संजय वाकडे, अमोल दामले, मीरा कुर्झेकर, कविता चन्ने, मीरा कुर्वे, रेखा जांभुळे, अल्का लाउतकर, मीरा उईके, प्रभा बावनकर, रूपाली क्षीरसागर, रूपाली टेंभुर्णे, नयनप्रभा टेंभुर्णे, हर्षता धाकडे, सुरेखा कानतोडे, श्रद्धा गणवीर, प्रमिला मने व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बाॅक्स

वैयक्तिक माेबाइलचा शासकीय कामांसाठी वापर नाही

अंगणवाडी सेविकांना त्यांच्या वैयक्तिक किंवा कुटुंबाच्या सामूहिक मोबाइलवर शासकीय काम करण्यास भाग पाडू नये, कारण सदर मोबाइल हा त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा पाल्य ऑनलाइन शिक्षणाकरिता किंवा खाजगी कामाकरिता वापरत असताना शासनाला माहिती पाठविण्याच्या माहितीत चुकीचा संदेश जाण्याचा धोका आहे. त्यामुळे पोषण ट्रॅकर ॲप मराठीत करावे, अशी मागणी करून जुने निकृष्ट दर्जाचे मोबाइल परत करण्यात आले व नवीन चांगल्या दर्जाचे मोबाइल देण्याची मागणी करण्यात आली.

090921\1951img_20210909_162406.jpg

आयटक च्या वतीने आंदोलनात सहभागी अंगणवाडी सेविका