शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:24 IST

विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयटकच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हा परिषदेवर धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१८ पासून वाढीव मानधनाचा अध्यादेश काढला आहे.

ठळक मुद्देशेकडो कर्मचाऱ्यांचा सहभाग : मानधनात वाढ करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आयटकच्या नेतृत्वात शुक्रवारी जिल्हा परिषदेवर धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१८ पासून वाढीव मानधनाचा अध्यादेश काढला आहे. मात्र अजूनपर्यंत वाढीव मानधन देण्यात आले नाही. २०१४ पासून सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी सेवानिवृत्तीचा लाभ देण्यात यावा. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या मानधनाची ५० टक्के रक्कम दरमहा पेन्शनमधून देण्यात यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन, प्रवास भत्ता व इंधन बिल त्वरीत द्यावे. रिक्त असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जागा त्वरीत भराव्या. अंगणवाडी केंद्राचे विद्युत बिल भरण्याचे आदेश ग्रामपंचायतीला द्यावे. आजारपणाची एक महिन्याची भरपगारी सुटी द्यावी. उन्हाळ्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शाळेप्रमाणे सुट्या द्याव्या. मिनी अंगणवाडीचे नियमित अंगणवाडीत रूपांतर करावे. प्रत्येक अंगणवाडी केंद्राला स्वतंत्र इमारत बांधून द्यावी. किरकोळ खर्चाची रक्कम वाढवून सहा हजार रुपये करावी. दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत वेतन करावे. आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. मागण्यांचे निवेदन महिला व बाल विकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केले. निवेदन देतेवेळी आयटकचे राज्य सचिव देवराव चवळे, डॉ. महेश कोपुलवार, अ‍ॅड. जगदिश मेश्राम, अमोल मारकवार, राधा ठाकरे, मिनाक्षी झोडे, म.रा. कुरंजेकर, जहारा शेख, ज्योती कोमलवार, शाहीस्ता शेख, रेखा जांभुळे, अनिता अधिकारी, रूपा पेंदाम, वसंती अंबादे, शिवलता बावणथडे, कौशल्या गोंधोळे, अल्का कुनघाडकर, कुंदा बंजवार, ज्योती कोल्हापुरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चा