शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी महिलांचा आक्रोश

By admin | Updated: September 2, 2014 23:45 IST

अंगणवाडीच्या माध्यमातून दुर्गम भागातील लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. तसेच त्यांचे आरोग्य सांभाळण्यासह त्यांना पोषण

चामोर्शी/अहेरी : अंगणवाडीच्या माध्यमातून दुर्गम भागातील लहान मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाचे धडे देण्याचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस करतात. तसेच त्यांचे आरोग्य सांभाळण्यासह त्यांना पोषण आहाराचा पुरवठाही करतात. प्रामाणिकपणे सेवा देत असतांनाही अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन ते चार महिन्यांपासूनचे मानधन थकले आहे. त्यामुळे चामोर्शी व अहेरी तालुक्यातील संतप्त महिला कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर उतरून शासन व प्रशासनाप्रती आक्रोश व्यक्त केला.अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत चामोर्शी येथे अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा मेळावा रविवारी घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी वीणा चन्नावार होत्या. तसेच या मेळाव्याला चामोर्शी प्रकल्प कार्यालयाच्या भागातून शेकडो अंगणवाडी महिला सेविका व मदतनिस उपस्थित झाल्या होत्या. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा. रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, तीन वर्ष लोटूनही केंद्र सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ केली नाही. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून केंद्र सरकारने गोरगरीब जनतेची फसवणूक केली आहे. मानधनात वाढ न करण्यात आल्याने अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांमध्ये शासनाप्रती प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी यापुढेही तीव्र लढ्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केले. या मेळाव्याचे आभार प्रदर्शन सुनीता उडाण यांनी केले. या मेळाव्याला दुर्गा जांपलवार, अंजना बोईनवार, कांता मोहुर्ले, शोभा मेक्कलवार आदींसह शेकडो महिला कर्मचारी उपस्थित होत्या. अहेरी बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी काम केले आहे. मात्र या महिला कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही. तसेच या कर्मचाऱ्यांचे तीन वर्षापासून इंधन बिल थकीत आहे. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना तत्काळ चार महिन्याचे मानधन अदा करण्यात यावे, तसेच तीन वर्षापासूनचे इंधन बिल देण्यात यावे, या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी डी. एस. वैद्य व विटाबाई भट यांच्या नेतृत्वात अहेरीच्या प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात महिलांनी नारेबाजी केली.