शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

अंगणवाडी महिलांचे जि. प. समोर धरणे आंदोलन

By admin | Updated: November 4, 2015 01:41 IST

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात मंगळवारी

गडचिरोली : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आयटकच्या नेतृत्वात मंगळवारी शेकडो अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आयटकप्रणीत अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा संघटक देवराव चवळे, माजी जि. प. सदस्य अमोल मारकवार, जगदीश मेश्राम, विनोद झोडगे यांनी केले. वारंवार निवेदने देऊनही तसेच चर्चा करूनही गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या समस्या कायम आहेत. या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासन व राज्य शासनाच्या धोरणावर तीव्र शब्दात ताशेरे ओढले. संतप्त महिला कर्मचाऱ्यांनी प्रशासन व शासनाच्या विरोधात नारेबाजी केली. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांना प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. दरम्यान यावेळी प्रलंबित मागण्यांवर अर्धातास चर्चा चालली. जिल्ह्यातील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचे केंद्र शासनाकडून प्राप्त झालेले आॅक्टोबर महिन्यापर्यंतच्या मानधनाची रक्कम बँकेत वर्ग करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून प्राप्त झालेली सप्टेंबर महिन्यापर्यंतची मानधनाची रक्कम देण्यात आली आहे. दिवाळी बोनसही देण्यात आले आहे. अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना ९ ते १६ नोव्हेंबरदरम्यान दिवाळी सणाच्या सुट्या दिल्या जाणार आहेत, अशी माहिती महिला व बाल कल्याण अधिकारी जाधव यांनी शिष्टमंडळातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी दिली. या चर्चेदरम्यान बाराही तालुकास्तरावरील बाल विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. धरणे आंदोलनाला संघटनेच्या पदाधिकारी अनिता जी. अधिकारी, शशिकला धात्रक, राधा ठाकरे, शिवलता बावनथडे, मिनती रॉय, कौशल्या गोंधळे, मीनाक्षी झोडे, गजुला उसेंडी, बसंती अंबादे, के. एम. बंडावार, शेख, जे. व्ही. कोमलवार यांच्यासह बाराही तालुक्यातील शेकडो अंगणवाडी महिला कर्मचारी उपस्थित होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)या आहेत प्रलंबित मागण्या४दिवाळीपूर्वी दिवाळी बोनसची रक्कम अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी ४दिवाळीपूर्वी आॅक्टोबर महिन्यापर्यंत थकीत मानधन, इंधन बिल, प्रवास भत्ता देण्यात यावा ४शासन निर्णयानुसार दिवाळी सणानिमित्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आठ दिवसांच्या सुट्या देण्यात याव्या. ४अंगणवाडीतील विद्युत बिल भरण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. ४अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्ववत नक्षलग्रस्त भत्ता लागू करावा. ४अंगणवाडी केंद्रात नियमित आहार पुरवठा करण्यात यावा.