शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांची मानधन वाढ थकली

By admin | Updated: March 13, 2017 01:27 IST

मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्र शासनाने जुलै २०१३ पासून ७५० रूपये मानधन वाढ केली आहे.

३ एप्रिल रोजी आंदोलन करणार : मिनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा अहेरीत मेळावा अहेरी : मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात केंद्र शासनाने जुलै २०१३ पासून ७५० रूपये मानधन वाढ केली आहे. मात्र अहेरी प्रकल्पातील मिनी अंगणवाडी सेविकांना या काळातील मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे या प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अहेरी प्रकल्प वगळता जिल्ह्यातील सर्व मिनी अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधनाचा मोबदला देण्यात आला आहे. मात्र अहेरी प्रकल्पातील एकाही अंगणवाडी सेविकेला मोबदला मिळाला नाही. याबाबत प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी चव्हाण यांना अंगणवाडी सेविकांनी विचार केली असता, प्रकल्पातील कर्मचारी मागील आठ दिवसांपासून लेखणीबंद आंदोलन करीत आहेत. त्यामुळे कामे ठप्प पडली आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना या आंदोलनाबाबत कळविण्यात आले असले तरी अजूनपर्यंत यावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे वाढीव मानधनाचा मोबदला थकला असल्याची माहिती दिली. कार्यालयातील आंदोलनाचा परिणाम अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनावर पडला आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संतप्त झाले आहेत. ३ एप्रिल रोजी मिनी अंगणवाडी सेविकांच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर १२ ते ३ या कालावधीत आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी दिली आहे. अहेरी येथे अंगणवाडी सेविकांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला बहुतांश मिनी अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. धरणे आंदोलनला उपस्थित राहावे, असे आवाहन संगीता वडलाकोंडावार, खैरूनिसा पठाण, विठाबाई भट, डी. एस. वैद्य, सत्तुबाई एनप्रेडीवार यांनी केले आहे.