लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शिक्षण विभागाकडून आयोजित विज्ञान भवनाच्या भेटीसाठी इतर साधन उपलब्ध नसल्याने चक्क ट्रॅक्टरने विद्यार्थ्यांना आरमोरीत आणण्याची वेळ तालुक्यातील शिवणी बूज. येथील जिल्हा परिषद शाळेवर आली. विद्यार्थ्यांच्या अशा अवैध ट्रॅक्टर प्रवासाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.आरमोरी येथील महात्मा गांधी विद्यालयातील विज्ञान भवन दाखविण्यासाठी शुक्रवारी पाचवी ते आठवीच्या ५८ विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमधून आणले जात होते. सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या ४०० मीटर अलिकडे उभा असताना तालुका काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष सुभाष सपाटे यांच्या लक्षात आले. विद्यार्थ्यांची मालवाहू वाहनाने वाहतूक करणे चुकीचे असल्याचे लक्षात येताच याबाबत त्यांनी पंचायत समिती गाठून संवर्ग विकास अधिकारी सजनपवार यांना विचारले असता, त्यांनी शिक्षण विस्तार अधिकारी राठोड यांना बोलाविले. राठोड यांनी शाळेने परवानगी घेतली नसल्याचे सांगितले आहे. याबाबत केंद्र प्रमुख व्ही. टी. फटींग यांना विचारले असता, विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरने नेण्यासाठी शिक्षण विभागाची परवानगी लागत नाही, असे उत्तर दिले. मात्र विद्यार्थ्यांना गट शिक्षणाधिकाºयांच्या पत्रानुसारच आरमोरी आणल्याचे सांगण्यात आले.शिक्षण विभागाचे शाळेला पत्रविद्यार्थ्यांना आरमोरी येथील बाल विज्ञान भवन दाखविण्याचे पत्र शिक्षण विभागाने दिले आहे. प्रत्येक शाळेला दिवस ठरवून दिला आहे. त्यानुसार शिवणी शाळेच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी विज्ञान भवन दाखवायचे होते. शिवणी येथे बससेवा उपलब्ध नाही. मानव विकासची बसही येत नाही. गावातील एका व्यक्तीने ट्रॅक्टर मोफत उपलब्ध करून दिला. ट्रॅक्टरच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आरमोरी येथे आणताना पुढे दोन शिक्षक व मागे दोन शिक्षक दुचाकीने होते. ट्रॅक्टर अतिशय कमी वेगाने चालवून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली होती, अशी माहिती शिवणी बूज येथील शिक्षकांनी दिली आहे.
अन् विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरने करावा लागला प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 22:47 IST
शिक्षण विभागाकडून आयोजित विज्ञान भवनाच्या भेटीसाठी इतर साधन उपलब्ध नसल्याने ....
अन् विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरने करावा लागला प्रवास
ठळक मुद्देशिवणी बूज शाळेतील विद्यार्थी : बालविज्ञान भवनाची पाहणी करण्यासाठी आरमोरी येथे प्रवास