शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

...अन् संतप्त रोहयो मजुरांनी केले कामबंद आंदोलन

By admin | Updated: June 13, 2017 00:39 IST

दिवसभर घाम गाळूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या बेलगाव येथील तलाव खोलीकरणाच्या कामावरील रोहयो मजुरांनी काम बंद पाडले.

बेलगाव येथील प्रकार : अभियंत्याच्या चुकीमुळे मिळत होती कमी मजुरी, मजुरांच्या अपरोक्ष कामाचे मोजमाप केल्याचा आरोपलोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : दिवसभर घाम गाळूनही अत्यल्प मजुरी मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर संतप्त झालेल्या बेलगाव येथील तलाव खोलीकरणाच्या कामावरील रोहयो मजुरांनी काम बंद पाडले. तालुक्यातील बेलगाव येथे जिल्हा परिषद सिंचाई विभागाच्या मार्फत रोजगार हमी योजनेंतर्गत तलाव खोलीकरणाचे काम करण्यात येत आहे. या कामावर गावातील ३०० पेक्षा अधिक मजूर कामावर आहेत. मागील एक आठवड्यापासून हे काम सुरू आहे. ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजता सिंचन विभागाचे शाखा अभियंता कुंभारे यांनी कामाला भेट देऊन कामाचे मोजमाप केले. यावेळी मोजकेच मजूर उपस्थित होते. मोजमापानंतर प्रत्येक मजुराला दिवसाची केवळ ७० ते ९० रूपये मजुरी पडत असल्याचे मजुरांच्या लक्षात आले. ही बाब मजुरांना माहित होताच ते संतप्त झाले. जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे, पं.स. सदस्य संध्या नैताम यांच्या नेतृत्वात रोहयो मजुरांनी सोमवारी सकाळीच कामबंद आंदोलन केले. पदाधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवरून आंदोलनाची माहिती पं.स. सभापती गिरीधारी तितराम, सिंचन विभागाचे उपअभियंता राऊत, शाखा अभियंता कुंभारे यांना देऊन रोहयो कामावर पाचारण केले. यावेळी मजुरांनी अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. मजुरांचा संताप लक्षात घेऊन मानवी दृष्टीकोनातून जेवढी मदत शक्य आहे, तेवढी मदत करण्याचे आश्वासन अभियंत्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले व मजूर कामावर परतले. नेमकी किती मजुरी पडणार आहे, याचे पत्ते मात्र सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे उघडले नाही.उन्हाळ्यात मातीचे खोदकाम त्रासदायकसिंचन विभागाच्या मार्फत मे, जून महिन्यात रोजगार हमी योजनेची कामे सुरू केली जातात. या कालावधीत जमिनीतील ओलावा पूर्णपणे संपला राहतो. त्यामुळे जमीन कडक येते. परिणामी खंती व इतर अवजारांच्या सहाय्याने खोदकाम करणे कठीण होते. ही बाब अधिकारी वर्गाला माहित नाही. मातीची कामे डिसेंबर, जानेवारी महिन्यातच सुरू करणे आवश्यक आहे. या कालावधीत मातीत ओलावा राहत असल्याने खोदकाम करणे कमी त्रासाचे होते. कमिशनच्या लालसेपोटी सिंचन विभागाचे अभियंते यंत्राच्या माध्यमातूनच रोहयोची कामे करण्यास अधिक पसंती दर्शवितात. मात्र मजुरांकडून कामे होत नसल्याने शासनाकडून दबाव वाढतो. शासनाला केवळ देखावा म्हणून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर सिंचन विभाग रोहयो कामांना सुरूवात करते, असा आरोप जिल्हा परिषद सदस्य प्रल्हाद कराडे यांनी केला आहे.