शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त फास्ट ट्रॅक विशेष न्यायालय स्थापन करावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 12:10 IST

सरकारकडे मागणी : पीडितांना जलद न्याय मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सद्यःस्थितीत भारतातील १०२३ फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्टामध्ये जरी कोणतीही नवीन प्रकरणे जोडली गेली नाहीत तरी प्रलंबित असलेली २,०२,१७५ बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणांचा विद्यमान अनुशेष दूर करण्यासाठी भारताला अंदाजे तीन वर्षे लागतील. हे सर्व पाहता देशभरात आणखी १००० फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट तातडीने निर्माण करण्यात यावे, अशी मागणी गडचिरोली येथील 'स्पर्श' संस्थेने राज्य शासनाला निवेदनातून केली आहे.

इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन या संस्थेच्या वतीने 'फास्ट ट्रॅकिंग जस्टिस : केस बॅकलॉग्स कमी करण्यासाठी फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट्सची भूमिका' हा अहवाल नवी दिल्ली येथे तीन दिवसीय कार्यशाळेत सादर करण्यात आला. या अभ्यासात अॅक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रोग्रॅममधील केस फाइल्सचा वापर करून पीडितांवर खटल्यांच्या चाचण्यांमध्ये होणाऱ्या विलंबाचा परिणाम समजून घेतला गेला. गडचिरोली जिल्ह्यात पॉक्सो प्रकरणावर काम करणाऱ्या स्पर्श संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप बारसागडे यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.

न्यायाची दीर्घ प्रतीक्षा गुन्ह्यालाही टाकते मागे पॉक्सो प्रकरणातील पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शांत बसण्याऐवजी त्यांना न्याय मिळावा यासाठी स्पर्श संस्था प्रयत्नरत आहे. हे कठोर सत्य हे आहे की न्यायाची दीर्घ प्रतीक्षा कधी कधी गुन्ह्यालाही मागे टाकते. हा अहवाल स्पष्टपणे दर्शवतो की अधिक जलदगती न्यायालयांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील पॉक्सो प्रकरणातील पीडिता आणि त्यांच्या कुटुंबीयांना लवकर न्याय मिळेल. महाराष्ट्र राज्यासाठी राखून ठेवलेले सर्व फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट कार्यान्वित करावे आणि नवीन फास्ट ट्रॅक स्पेशल कोर्ट स्थापन करावे, अशी मागणी डॉ. बारसागडे यांनी केली आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली