शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णवाहिका तिपटीने महागली

By admin | Updated: May 19, 2016 01:14 IST

शासकीय रूग्णवाहिकेचे दर शासनाने तिपटीने वाढविल्याने याचा फटका दुर्गम भागातील गरीब रूग्णांना बसत आहे.

तीन पट वाहतूक दर वाढले : खासगी वाहनांचा घ्यावा लागत आहे आधारप्रतीक मुधोळकर अहेरीशासकीय रूग्णवाहिकेचे दर शासनाने तिपटीने वाढविल्याने याचा फटका दुर्गम भागातील गरीब रूग्णांना बसत आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष सुट देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामीण भागातील रूग्णांना तालुकास्थळावरील ग्रामीण रूग्णालयात भरती करणे व ग्रामीण तसेच उपजिल्हा रूग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या रूग्णांना गडचिरोली, चंद्रपूर किंवा नागपूर येथे हलविण्यात रूग्णवाहिका अत्यंत मोलाची कामगिरी पार पाडते. रूग्णवाहिकेचे आजपर्यंतचे दर सर्वसामान्य व गरीब नागरिकांच्या आवाक्यामधील होते. प्रती किलोमीटर पाच रूपये एवढा दर आकारला जात होता. मात्र २८ डिसेंबर २०१५ च्या शासन निर्णयानुसार आरोग्य सुविधांच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. यामध्ये रूग्णवाहिकेचा दर्जा प्रती किमी पाच रूपयांवरून १५ रूपये एवढा केला आहे. त्यामुळे रूग्णांना अधिकचे पैसे मापावे लागत आहेत. त्यामुळे अनेक रूग्णांचे नातेवाईक रूग्णाला रूग्णवाहिकेतून नेण्याचे टाळत असल्याचे चित्र दिसून येते. सद्यस्थितीत फक्त गरोदर मातांनाच मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या जाते. त्यामुळे काही रूग्णालयातील डॉक्टर या गरोदर मातेसोबतच रूग्णाला पाठवित आहेत. मात्र गरोदर माता न मिळाल्यास पैसे मोजण्याशिवाय पर्याय राहत नाही. रूग्णाला रूग्णालयामध्ये पोहोचविल्याबरोबर रूग्णवाहिकेचे बिल नगदी स्वरूपात देणे आवश्यक आहे. अन्यथा विलंब शुल्क आकारण्यात येते. या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. तासाला ७५ रूपये शुल्क आकारण्यात येत आहे. या वाढीव शुल्कामुळे रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासाठी शुल्कामध्ये कपात करण्यात यावी, अशी मागणी आहे. रेपर टू गडचिरोली रूग्णांची संख्या अधिकमोठ्या गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तालुकास्थळावर ग्रामीण रूग्णालय तसेच आरमोरी, कुरखेडा व अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालय असले तरी या रूग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टरविनाच चालविली जात आहेत. ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात निम्म्यापेक्षा अधिक डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. अत्याधुनिक साधनेही उपलब्ध नाही. त्यामुळे या रूग्णालयामध्ये भरती होणाऱ्या बहुतांश रूग्णांना गडचिरोली येथे रेफर करण्याचा सल्ला दिला जातो. अर्ध्यापेक्षा अधिक रूग्ण रेफर केले जातात. या रूग्णांना रूग्णवाहिकेचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे रूग्णवाहिकेचे वाढलेले दर नातेवाईकांसाठी अडचणीचे झाले आहेत.