शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
2
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
3
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
4
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
5
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
6
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
7
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
8
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
9
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
10
चमत्कार! ११ वर्षांच्या मुलावरून गेले मालगाडीचे ४० डबे, साधं खरचटलंही नाही
11
जळगावमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराची माघार अन् शिंदेसेनेचं खातं उघडलं! आमदार पुत्र गौरव सोनवणे बिनविरोध
12
भारतीय अर्थव्यवस्थेची भरारी! बँकांचा पाया भक्कम, एनपीए घटला; RBI च्या अहवालात नेमकं काय म्हटलंय?
13
वडील आणि भावाला गमावलं, दु:खाचा डोंगर कोसळला, पण खचला नाही, आता कमबॅकसाठी सज्ज झालाय हा भारतीय गोलंदाज
14
Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार
15
Ai व्हिडिओद्वारे 'या' भारतीय युट्यूब चॅनेलने एका वर्षात केली तब्बल 38 कोटी रुपयांची कमाई
16
Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम
17
अखेर मुंबईत ‘या’ ठिकाणी ठाकरे बंधू आमने-सामने; मनसे-उद्धवसेनेने अर्ज भरले, कोण माघार घेणार?
18
Vastu Tips: २०२६ मध्ये नशीब सोन्यासारखं चमकेल, फक्त कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर करा 'हा' छोटा बदल!
19
हातात बिअरची बाटली घेऊन गोव्यातील रस्त्यावर फिरताना दिसली सारा तेंडुलकर, फोटो झाला व्हायरल   
20
रेखा झुनझुनवाला यांच्याकडे 'या' कंपनीचे आहेत १७ लाखांपेक्षा अधिक शेअर्स; मोठी अपडेट, आता शेअरमध्ये हेवी बाईंग
Daily Top 2Weekly Top 5

आईस फॅक्टरीतून अमोनियाची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 22:59 IST

येथील पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या आईस फॅक्टरीतून सिलिंडरमधून अमोनिया वायूची सोमवारी गळती सुरू झाली. त्यामुळे कारखान्यासभोवतालच्या व्यक्तींना अस्वस्थ वाटू लागले. वेळीच अग्निशमन दलालाने पाण्याचा फवारा केल्याने मोठी दुर्घटना टळली.

ठळक मुद्देअनेकांना जळजळ : नगर परिषद व पोलीस विभागाने दाखविली सतर्कता

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या आईस फॅक्टरीतून सिलिंडरमधून अमोनिया वायूची सोमवारी गळती सुरू झाली. त्यामुळे कारखान्यासभोवतालच्या व्यक्तींना अस्वस्थ वाटू लागले. वेळीच अग्निशमन दलालाने पाण्याचा फवारा केल्याने मोठी दुर्घटना टळली.पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस केदारवाड्यात बर्फ निर्मिती करणारी फॅक्टरी आहे. बर्फाची निर्मिती करण्यासाठी अमोनिया वायूचा वापर केला जातो. यासाठी फॅक्टरीमध्ये स्वतंत्र सिलिंडर आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे सोमवारी सिलिंडरमधून अमोनिया वायूची गळती होण्यास सुरूवात झाली. आईस फॅक्टरीमधील एका मजुराला रुग्णालयात भरती करावे लागले. तर सभोवतालच्या दुकानदारांना जळजळ वाटण्यास सुरूवात झाली. हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे यांच्या लक्षात आला. त्यांनी पोलीस स्टेशन, नगर परिषदेला याबाबतची माहिती दिली. नगर परिषदेने अग्निशमन बोलावून इमारतीवर पाण्याचा मारा केला. अमोनिया हा वायू पाण्यामध्ये विरघळते. त्यामुळे काही वेळात अमोनियाचा प्रभाव कमी झाला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजीव ओहोळ, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, ठाणेदार दीपरत्न गायकवाड यांनी स्वत: उपस्थित राहून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. परिस्थिती सध्या आटोक्यात आहे.वस्तीतून आईस फॅक्टरी हटविण्याची मागणीकेदारवाडा हा अगदी गडचिरोली शहराच्या मध्यभागी आहे. याच ठिकाणी आईस फॅक्टरी आहे. या आईस फॅक्टरीच्या सभोवताल दुकाने व लोकवस्ती आहे. या ठिकाणी अमोनिया व फ्रेआॅन या वायूंचा वापर केला जातो. हे दोन्ही वायू आरोग्यास हानीकारक आहेत. अमोनिया व फ्रेआॅन वायु गळतीमुळे दिल्ली येथील आईस फॅक्टरीत जवळपास २०० व्यक्ती बाधित झाले. त्यापैकी काहींचा मृत्यू सुद्धा झाला. अशी दुर्घटना गडचिरोलीतही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर आईस फॅक्टरी शहरातून हटवावी, अशी मागणी अंनिसचे जिल्हाध्यक्ष उद्धव डांगे यांनी केली आहे.