गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात उघडकीस आलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात गडचिरोली पोलिसांनी संकल्पसिध्दी बहुउद्देशीय संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले इंस्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट अँड टेक्नालॉजीचा संस्थाचालक अमित बंदे, सहायक समाज कल्याण आयुक्त तुकाराम बरगे व समाज कल्याण आयुक्त कार्यालयातील लिपिक विजय बागडे, आदिवासी विकास विभागातील लिपिक संजय सातपुते या चौघांना शनिवारी गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने अमित बंदे याच्या पोलीस कोठडीत ६ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तर सहायक समाज कल्याण आयुक्त तुकाराम बरगे, लिपिक विजय बागडे व संजय सातपुते यांची पोलीस कोठडी संपून त्यांना न्यायालयीन कोठडीत चंद्रपूर कारागृहात पाठविण्यात आले आहे. त्यामुळे आता बरगेसह दोन लिपिकांचा चंद्रपूर कारागृहात मुक्काम वाढणार आहे. आदिवासी विकास विभागाचे तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके सध्या चंद्रपूर कारागृहातच आहे. त्यांच्या जामिनाबाबत सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी होणार असल्याची माहिती विशेष तपास अधिकारी पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अमित बंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
By admin | Updated: April 5, 2015 01:46 IST