शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकन मुलांच्या भेटवस्तू पोहोचल्या गडचिरोलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 13:05 IST

अमेरिकन मुलांनी स्वत:च्या खाऊच्या पैशातून काही पैसे बचत केले. त्यातून खरेदी केलेल्या वस्तू थेट गडचिरोली जिल्ह्यात पोहोचल्या असून आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.

ठळक मुद्देदेलनवाडीतील विद्यार्थ्यांना वितरित : भारतीय सेवक संगती संस्थेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : अमेरिकन मुलांनी स्वत:च्या खाऊच्या पैशातून काही पैसे बचत केले. त्यातून खरेदी केलेल्या वस्तू थेट गडचिरोली जिल्ह्यात पोहोचल्या असून आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या भेटवस्तूंचे वितरण करण्यात आले.ख्रिसमस सणानिमित्त भेटवस्तू देण्याची परंपरा अमेरिकेत आहे. अमेरिकेतील सॅमॅरिटन्स पर्स चर्चचे प्रमुख फ्रँकलीन ग्राहम हे अमेरिकन मुलांना त्यांच्या खाऊच्या पैशातून काही पैसे बचत करण्यासाठी प्रवृत्त करतात. बचत झालेले पैसे फॅकलिन ्नग्राहम यांच्याकडे जमा केले जातात. या पैशातून फ्रँकलीन स्वत: साहित्य खरेदी करून गरीब देशातील गरजू मुला, मुलींना वितरित करतात. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या भारती सेवक संगती या सेवाभावी संस्थेने भेटवस्तू गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध व्हाव्या, यासाठी फ्रँकलीन ग्राहम यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार फ्रँकलीन यांनी भारतीय सेवक संगती संस्थेकडे साहित्य उपलब्ध करून दिले.अमेरिका ते मुंबई पुढे देलनवाडी असा प्रवास करत या वस्तू देलनवाडी येथे पोहोचविण्यात आल्या. या कार्यासाठी भारतीय सेवक संगतीचे प्रमुख प्रफुल्ल गद्देलवार, रवींद्र खोब्रागडे, माया खोब्रागडे, सूरज खोब्रागडे, अमोल कावठवार यांनी पुढाकार घेतला. साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी अनिलकुमार ठवरे, अश्विनी ठवरे, जवंता ठवरे, कुमरी पलछीन ठवरे यांनी सुद्धा शिफारस केली होती.देलनवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून अमेरिका येथून प्राप्त झालेल्या वस्तू देलनवाडी येथील विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आल्या. वस्तूंमध्ये शैक्षणिक साहित्य, आकर्षक खेळणी, टी-शर्ट, पॅन्ट, घरगुती वापराच्या वस्तू, टॉर्च, साबन, पुस्तके यांचा समावेश आहे. अत्यंत चांगल्या व आकर्षक वस्तू असल्याने देलनवाडी येथील विद्यार्थी भारावून गेले. सुंदर व उपयोगी वस्तू बघून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. विशेष म्हणजे दिवाळीच्या पूर्वीच वस्तू उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.वस्तू वितरण कार्यक्रमाला मुख्याध्यापक बन्सोड, अंजिरा मालई, राहुल बन्सोड, संतोष मने, विजय मडावी यांच्यासह पं.स.सदस्य किरण मस्के, तंमुस अध्यक्ष विनायक गरमळे, विजया नेवारे, कोमल धुर्वे, रमेश भैसारे, वाल्मिक नन्नावरे, वैशाली भैसारे, रेखा जांभुळे, रूपाली टेंभूर्णे, पल्लवी कुमरे आदींसह गावातील नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक