शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकरी चळवळ राज्यात रूजविणार - सुरेश माने

By admin | Updated: August 28, 2015 00:10 IST

आंबेडकरी चळवळ राजकारणात यशस्वी होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्न करीत आहेत.

आरमोरीत आंबेडकरी युवा संमेलन : शेकडो युवकांची उपस्थितीआरमोरी : आंबेडकरी चळवळ राजकारणात यशस्वी होऊ नये म्हणून काही लोक प्रयत्न करीत आहेत. राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील युवकांचा कार्यकर्त्यांचा वापर विविध पक्ष करीत आहेत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात ही चळवळ यशस्वी झाली नाही. भूतकाळात झालेल्या चुका भविष्यात होऊ नये याची खबरदारी घेणे ही आजची गरज आहे. येणाऱ्या पाच वर्षात सक्रीय युवकांना चळवळीत घेऊन आंबेडकरी चळवळ राज्यात रूजविली जाईल, असे प्रतिपादन आंबेडकरी विचारवंत तथा संविधानतज्ज्ञ अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी केले.बहुजन रिपब्लिकन आंबेडकर राईट्स मुव्हमेंटच्या वतीने आरमोरी येथील साई सभागृहात बिरसा मुंडा, फुले, शाहू, आंबेडकरी युवा संमेलन, डॉ. बाबासाहेबानंतर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक व राजकीय स्तरावर अपयश का? आजचा तरूण आंबेडकरी चळवळीपासून का दुरावतोय? कारणे व उपाय या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त सनदी अधिकारी किशोर गजभिये होते. संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून अ‍ॅड. भुपेन रायपुरे, नंदू नरोटे, संजय मंगर, विजय ठवरे, सर्वजीत बन्सोडे, संजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी किशोर गजभिये यांनी मार्गदर्शन करताना आजच्या युवा पिढीवर भविष्याची जबाबदारी आहे. त्यामुळे व्यवस्थेला आव्हान देऊन लढण्याची ताकद युवकांमध्ये निर्माण करण्याचे काम आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्यांनी केले पाहिजे. काही लोक दलित, आदिवासी व बहुजन समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांपासून सावध राहिले पाहिजे. जुने विचार डोक्यातून काढून नवीन विचारांची साठवणूक करा, असे आवाहन त्यांनी युवकांना केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. कैलाश नगराळे, खिरेंद्र बांबोळे, राज बन्सोड, बाळू टेंभुर्णे, मोरेश्वर बारसागडे, यशवंत जांभुळकर, क्षिरसागर शेंडे, किशोर सहारे, अनिल ठवरे, जयकुमार शेंडे, देवा बनकर, हिरा राऊत, गणपत तावाडे यांनी सहकार्य केले.