शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

३ हजार २०० किमीच्या रस्त्यांचा अनुशेष कायमच

By admin | Updated: February 25, 2015 01:39 IST

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत ग्रामीण रस्त्यांची प्रचंड दूरावस्था झाली असून जिल्ह्यात अद्याप ३ हजार २०३ किमी लांबीच्या रस्त्यांचा अनुशेष कायमच आहे.

लोकमत विशेषगडचिरोली : गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत ग्रामीण रस्त्यांची प्रचंड दूरावस्था झाली असून जिल्ह्यात अद्याप ३ हजार २०३ किमी लांबीच्या रस्त्यांचा अनुशेष कायमच आहे. ते रस्ते निर्माण करण्यासाठी ६०० कोटी रूपयांची गरज असल्याचे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने राज्य सरकारला कळविले आहे. प्रती वर्षी १०० कोटी रूपयें मिळाल्यास सहा वर्षांत हा अनुशेष भरून काढता येईल, असेही जिल्हा परिषदेने राज्य शासनाला सूचविले आहे. गडचिरोली हा नक्षलग्रस्त जिल्हा असून या जिल्ह्यात वनाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पर्जन्यमान अधिक प्रमाणात होते. यामुळे सध्या असलेल्या रस्त्यांची ही बिकट अवस्था झाली आहे. जिल्हा परिषदेकडे जिल्हा मार्ग व ग्रामीण रस्ते येतात. जिल्हा परिषदजवळ या रस्त्यांच्या दुरूस्तीसाठीही अडचण आहे. शिवाय जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या भागात नवे रस्ते निर्माण करण्याचे कामही निधी अभावी रखडलेले आहे. त्यामुळे याचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. २००१ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात १३७५ किमी रस्ते विकासाचे उद्दीष्ट होते. तर २०२१ पर्यंत ५००९ किमी रस्ते निर्मितीचे उद्दीष्ट जिल्हा परिषदेने निश्चित केले आहे. यापैकी २००१ पर्यंत केवळ ८८८ किमी व २०१५ पर्यंत २ हजार २९३ किमी लांबींच्या रस्त्याची निर्मिती करण्यात आली. अद्यापही जिल्ह्यात ४८७ किमी लांबीचे इतर जिल्हा मार्ग २ हजार ७१६ किमी लांबीचे ग्रामीण रस्ते व्हायचे आहेत, असे दोन्ही मिळून ३ हजार २०३ किमी लांबीचे रस्ते बांधावे लागणार आहे. यासाठी २० लक्ष प्रती किमी प्रमाणे ३ हजार २०० किमीच्या रस्ते निर्मितीसाठी ६०० कोटी रूपयांची आवश्यकता आहे. जिल्हा परिषदेने राज्य सरकारला हा संपूर्ण आराखडा सादर केला आहे. राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे हा आराखडा देण्यात आला आहे. राज्य सरकारने प्रती वर्षी १०० कोटी रूपयें जिल्हा परिषदेला दिल्यास सहा वर्षांत रस्ते कामाचा हा अनुशेष पूर्ण होईल, असे जिल्हा परिषदेने म्हटले आहे. (नगर प्रतिनिधी)