शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

दशपर्णी आणि निंबोळी अर्क ठरतील कीटकनाशकाला पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 12:21 IST

 कीटकनाशकांचा वापर टाळून त्याला पर्याय म्हणून दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्काचा वापर करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडून मार्गदर्शनशेतकऱ्यांना अर्क बनविण्याचे प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महागड्या कीटकनाशकांचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहे. जमिनीचा पोत बिघडण्यापासून तर मानवी जीवास हाणीकारक ठरणाऱ्या कीटकनाशकांचा वापर टाळून त्याला पर्याय म्हणून दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्काचा वापर करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना हा अर्क बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे.तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या जात आहेत. खरीप हंगामातील पिकांसाठी योग्य ते मार्गदर्शन देताना बीज प्रक्रियेची माहिती, तसेच कीडीसाठी मारक ठरणाऱ्या विविध झाडांच्या पाल्यापासून बनविल्या जाणाऱ्या दशपर्णी अर्काचे आणि निंबोळीचे महत्व शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. एवढेच नाही तर प्रत्यक्ष तो अर्क कसा बनवायचा याचे प्रात्यक्षिकही दाखविले जात आहे.आरमोरी तालुक्यातील रवी येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यशाळेला तालुका कृषी अधिकारी जी.एन.जाधव, कृषी सहायक डी.के.क्षिरसागर, वाय.एच.सहारे, अविनाश हुकरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. खते व कीटकनाशकांच्या अतिवापराचे दुष्परिणाम यावरही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. महागड्या कीटकनाशकांसोबत महागडे बियाणे खरेदी करणे टाळून घरच्या बियाण्यांवर प्रक्रिया कशी करावी, याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

टॅग्स :agricultureशेती