शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

७६ कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 00:03 IST

खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील १८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ७६ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्जाचे वितरण झाले आहे. शेतीसाठी यंत्रांचा वापर केला जातो. तसेच खते, कीटकनाशके, बियाणे सुद्धा खरेदी करावे लागतात.

ठळक मुद्देखरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ : दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ४८ टक्के वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खरीप हंगामासाठी जिल्हाभरातील १८ हजार ५१३ शेतकऱ्यांना ७६ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ४८ टक्के कर्जाचे वितरण झाले आहे.शेतीसाठी यंत्रांचा वापर केला जातो. तसेच खते, कीटकनाशके, बियाणे सुद्धा खरेदी करावे लागतात. या सर्व बाबींवर हजारो रुपयांचा खर्च होतो. एवढा पैसा शेतकºयाकडे राहत नसल्याने सावकाराकडून कर्ज काढावे लागत होते. सावकाराकडून मागितलेल्या कर्जावर मोठ्या प्रमाणात व्याजदर आकारला जात असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत होता. कधीकधी कर्जापाई आत्महत्याही करावी लागत होती. शेतकºयाला सावकाराच्या पाशातून बाहेर काढण्यासाठी शासनाने पीक कर्ज ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकºयांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. बँकांनी शेतकºयांना कर्ज द्यावे, यासाठी प्रत्येक बँकेला कर्ज देण्याची सक्ती करण्यात आली आहे.२०१९ च्या खरीप हंगामात जिल्हाभरातील बँकांनी १५७ कोटी ७० लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले होते. काही शेतकºयांनी खरीप हंगामाच्या सुरूवातीलाच कर्जाची उचल केली आहे तर काही शेतकरी अजूनही कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. २२ जुलैपर्यंत १८ हजार ५१३ शेतकºयांना बँकांनी ७६ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ४८.३३ कोटी रुपये कर्जाचे वितरण झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येच्या तुलनेत बँकांची संख्या कमी आहे. काही गावांना बँकेपर्यंत पोहोचण्यासाठी ५० किमी अंतर गाठावे लागते. कर्जाची केस मंजूर करण्यासाठी आठ दिवस फेºया झाल्यास शेतकºयाचे हजारो रुपये खर्च होतात. तसेच ये-जा करण्याची सुविधा नसल्याने शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. परिणामी दुर्गम व नक्षलग्रस्त भागात वास्तव्यास असलेले शेतकरी कर्ज घेण्यास तयार होत नाही. परिणामी बँकांना दिलेल्या उद्दिष्टाएवढे कधीच कर्ज वितरण होत नाही.कर्जमाफीअभावी नवीन कर्जाची उचल थांबलीदोन वर्षांपूर्वी शासनाने कर्जमाफी केली. याचा लाभ अजूनही काही शेतकºयांना मिळाला नाही. जुने कर्ज कायम असल्याने नवीन कर्ज बँका देण्यास तयार होत नाही. कर्ज माफ होईल, या अपेक्षेने शेतकरी सुद्धा कर्ज भरत नाही. परिणामी मागील दोन वर्षांपासून कर्ज उचलणाºया शेतकºयांची संख्या घटली आहे. जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत, त्याच शेतकºयांनी कर्जाची उचल केली आहे. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश बँकांना असले तरी बँकाही फारसा पुढाकार घेत नाही.सहकारी बँकेतर्फे ४४ कोटींचे कर्ज वितरणकर्ज वितरणात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आघाडी घेतली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्हाभरात ५० पेक्षा अधिक शाखा आहेत. यातील बहुतांश शाखा ग्रामीण व दुर्गम भागात आहेत. त्यामुळे शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेण्यास प्राधान्य देतात. सहकारी बँकेला यावर्षीच्या खरीप हंगामात ५५ कोटी ७५ लाख रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ४४ कोटी ५५ लाख रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे. बँकेला दिलेल्या उद्दिष्टाच्या ७९.९१ टक्के कर्ज वितरण झाले आहे. पुन्हा कर्ज वाटप वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज