शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चकमकीत ठार झालेले सर्व इसम नक्षली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:10 IST

२२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले. सदर घटनेबाबत सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला होता.

ठळक मुद्देमानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा दावा : सत्यशोधन समितीचे आरोप ठरविले निराधार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले. सदर घटनेबाबत सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्र परिषद घेऊन सत्यशोधन समितीचे सर्व आरोप फेटाळले. तसेच कसनासूर चकमकीत ठार झालेले सर्व इसम नक्षलवादी आहेत. झालेली ही चकमक १०० टक्के खरी असून या चकमकीत निरपराध लोकांचा बळी गेला नाही, असा दावा भारतीय मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी गडचिरोली येथे पत्र परिषद घेऊन केला.पत्र परिषदेला मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे, प्रदेश निरिक्षक पुरूषोत्तम ठाकरे, विभागीय अध्यक्ष शशिकांत मोकासे, विलास झोडगे, मंगेश कामडी, निखील सुंदरकर, रेवती रेभनकर, दिनेश चुधरी, माधवी कुळमेथे, संजय रामटेके आदी उपस्थित होते.यावेळी पुरूषोत्तम ठाकरे व गजेंद्र डोमळे यांनी सांगितले की, मानवाधिकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोकाशी यांनी कसनासूर जंगलात झालेल्या नक्षल चकमकीची दखल घेऊन चौकशी समिती तयार केली. या समितीतील सहा पदाधिकाºयांनी ६ मे रोजी कसनासूर व बोरीया गावाला प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेची सत्यता स्थानिकांकडून जाणून घेतली. सदर चकमक खोटी नसून सत्य आहे, असे चौकशीअंती कळले, असे डोमळे व ठाकरे यावेळी म्हणाले. भारतीय मानवाधिकार परिषद ही नक्षल समर्थक अथवा नक्षलविरोधी नाही. तसेच पोलीस समर्थक अथवा पोलीस विरोधीही नाही, असे स्पष्ट करीत कसनासूर चकमकीबाबत ज्या संस्था व व्यक्तींनी नक्षल समर्थनाची भूमिका घेतली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच केंद्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाकडून सदर नक्षल चकमकीची नि:पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी