शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रात सर्व कर्मचारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:47 IST

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अजय कंकडालवार यांनी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अहेरीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या महागाव आरोग्य केंद्राला भेट दिली असता, येथे एकही कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले नाही. दरम्यान वैैद्यकीय अधिकारी डॉ. उईके ह्या वेळेवर सदर आरोग्य केंद्रात पोहोचल्या.

ठळक मुद्देआमगाव केंद्रातील बायोमेट्रिक मशीन बंद : जि. प. उपाध्यक्षांच्या आकस्मिक भेटीत उघड

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अजय कंकडालवार यांनी सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अहेरीपासून ७ किमी अंतरावर असलेल्या महागाव आरोग्य केंद्राला भेट दिली असता, येथे एकही कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले नाही. दरम्यान वैैद्यकीय अधिकारी डॉ. उईके ह्या वेळेवर सदर आरोग्य केंद्रात पोहोचल्या.सदर प्राथमिक आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक मशीन बंद असून कोणतेही कर्मचारी वेळेवर कर्तव्यावर येत नाही. कर्मचाऱ्यांवर कोणत्याही अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही. गावातील नागरिकांनी यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या. मात्र कर्मचाºयांवर कोणताही परिणाम झाला नाही. या सर्व गंभीर बाबीची दखल घेऊन कर्मचाºयांनी नियमित उपस्थित राहून आरोग्य सेवा देण्याचे निर्देश जि. प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी अधिनस्त अधिकाºयांना दिले.लाखो रूपये खर्च करून शासनाने महागाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशस्त इमारत बांधली. या आरोग्य केंद्रात जवळपास २५ ते ३० कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनतेच्या सेवेपोटी सदर कर्मचारी महिन्याला वेतन घेतात. मात्र त्याचा कोणताही फायदा महागाव परिसरातील नागरिक व रूग्णांना मिळत नसल्याचे विदारक वास्तव जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या आकस्मिक भेटीदरम्यान उजेडात आले. आरोग्य सेवेत कामचुकारपणा व हयगय मुळीच खपवून घेणार नाही, असा इशारा उपाध्यक्ष कंकडालवार यांनी दिला. यावेळी कार्यकर्ते हजर होते.