शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात एड्स जनजागृती रॅली

By admin | Updated: December 1, 2014 22:54 IST

एचआयव्ही एड्सचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृतीची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात शाळा, विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. विविध घोषवाक्य व संबोधनातून

गडचिरोली : एचआयव्ही एड्सचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जाणीव जागृतीची आवश्यकता लक्षात घेऊन शहरात शाळा, विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली काढली. विविध घोषवाक्य व संबोधनातून विद्यार्थ्यांनी शहरात जनजागृती केली. त्यामुळे शहरातील वातावरण दुमदुमले होते. जिल्हा एड्स नियंत्रण समिती जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीची सुरूवात सामाजिक कार्यकर्ते नामदेव गडपल्लीवार यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ. शैलजा मैंदमवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महेश भांडेकर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीला एड्स विरोधी शपथेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर रॅली शहरातील मुख्य मार्गावरून फिरवून नवीन स्त्रि रूग्णालय परिसरात समारोप करण्यात आला. दरम्यान आयोजित कार्यक्रमात डॉ. अनिल रूडे यांनी जीवनात संयम पाळा, तरूण वयात असणारे धोके व त्यापासून होणारे परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. त्याबरोबरच तालुकास्तरावरील आयटीसीटीसी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कबीर निकुरे यांनी एचआयव्ही बाधितांना सामान्य जीवन जगता येते, याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन सविता वैद्य तर आभार रंजना भंडारवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी माधूरी देवांगन, संतोषी भारती, अनिल राऊत, बेबीनंदा डोंगरे, रंजना पंदिलवार, अजिता पाणीकर, अरूण डोनारकर, रजनी चौधरी यांनी सहकार्य केले. यावेळी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. शहरातील सनराईज स्कूलच्यावतीने जागतिक एड्स निर्मूलन दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक डॉ. राहूल ठवरे, मुख्याध्यापिका शीतल खोब्रागडे, धनश्री कायनात, जयश्री, वर्षा, आशा, माधुरी, रिना आदी सहभागी झाल्या होत्या. रॅलीत विद्यार्थ्यांनी विविध घोषवाक्यातून नागरिकांमध्ये जाणीव जागृती केली.