शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
येमेनमध्ये केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशी टाळणारे हे 94 वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा? जाणून घ्या
3
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
6
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
7
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
10
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
11
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
12
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
13
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
14
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
15
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
16
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
17
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
18
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
19
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
20
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

दुष्काळग्रस्त लोकांसाठी अहेरीकरांची मदत

By admin | Updated: April 19, 2016 05:39 IST

मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांना दिलासा

अहेरी : मराठवाड्यासह विदर्भाच्या काही भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी हेल्पिंग हॅन्ड्स बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था अहेरीच्या वतीने दान महोत्सव राबविण्यात आला. या महोत्सवादरम्यान जमा झालेले वस्तू व कपडे भरून वाहनातून हेल्पिंग हॅन्ड्सची चमू सोमवारी यवतमाळकडे रवाना झाली.दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी हेल्पिंग हॅन्ड्स संस्थेच्या कार्यकर्त्यांसह लोकप्रतिनिधी तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. वापरात न येणाऱ्या वस्तू व कपडे जमा करण्याचे काम हेल्पिंग हॅन्ड्सतर्फे हाती घेण्यात आले. गेल्या १० दिवसांपासून संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम राबविला. जमा झालेले कपडे व वस्तू श्रमसाफल्य बहुउद्देशिय संस्था घाटंजी, आधार फाऊंडेशन यवतमाळ व अस्तित्व फाऊंडेशन यवतमाळ यांच्या मदतीने दुष्काळग्रस्त भागात पोहोचविण्यात येणार आहे. जमा झालेले कपडे व वस्तूंनी भरलेल्या वाहनाला जि. प. च्या महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, आर्यवैश्य कोमटी समाज अहेरीचे अध्यक्ष प्रकाश गुडेल्लीवार, प्रतिष्ठीत नागरिक मुतन्ना दोंतुलवार, अहेरी नगर पंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापती अर्चना विरगोनवार यांनी हिरवी झेंडी दाखविली. याप्रसंगी अहेरीचे नगरसेवक श्रीनिवास चटारे, नगरसेविका ममता पटवर्धन, पूर्वा दोंतुलवार, किरण भांदककर, हेल्पिंग हॅन्ड्सचे अध्यक्ष प्रतीक मुधोळकर, सचिव शंकर मगडीवार, सदस्य इस्ताक शेख आदींसह हेल्पिंग हॅन्ड्सचे इतर सदस्य उपस्थित होते. हेल्पिंग हॅन्ड्सच्या वतीने वापरात न येणाऱ्या वस्तू व कपडे जमा करण्याच्या उपक्रमासाठी प्रतीक मुधोळकर, पूर्वा दोंतुलवार, अर्चना विरगोनवार, ममता पटवर्धन, शंकर मगडीवार, नूर मोहम्मद, संदीप गुम्मलवार, अनुराग बेझलवार, आशिष गडपाडे, अमित दोंतुलवार, मयूर बुम्मुलवार, सोनू नार्लावार आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)